प्रतिनिधी औरंगाबाद @ दत्ता जाधव
औरंगाबाद - देवानगरी जवळील पिडब्ल्यूडी कॉलॉनीतील घटना पांढऱ्या चारचाकी वाहनातून आलेल्या तीन ते चार हल्लेखोरांनी हवेत गोळीबार करीत बांधकाम व्यावसायिकांचे अपहरण केले.ही घटना साडे अकरा वाजेच्या दरम्यान औरंगाबादेतील देवानगरी जवळील पिडब्ल्यूडी कॉलॉनील घडली.या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून पोलीस अफरांकर्त्याचा शोध घेत आहे.
नाजीम पठाण राउफ पठाण असे अपहरण झालेल्या बांधकाम व्यावसायिकांचे नाव आहे.या धक्कादायक घटने प्रकरणी अधिक माहिती अशी की,बँकेत नोकरी करीत असलेले मदन अवधूत भोसले यांच्या घराच बांधकामचा ठेका पठाण यांनी घेतला होता. आज ते साईड वर सकाळी आले व कामगारांकडून बांधकामाची माहिती घेत असताना अचानक एका पांढऱ्या रंगाच्या एका चारचाकी वाहनातून तीन ते चार व्यक्ती त्या ठिकाणी आले.व त्यांनी पठाण यांच्याशी हस्तांदोलन केले व त्याचवेळी धक्कादेत पठाण यांना गाडी मध्ये ढकलत हवेत गोळीबार करून अपहरण करून पळ काढला. बंदुकीच्या गोळीचा आवाज आल्याने कामगारांनी बाहेर येऊन पाहिले असता हल्लेखोरांनी तो पर्यंत पळ काढला होता.या घटनेची माहिती मिळताच साह्ययक आयुक्त सुरेश वानखेडे, सातारा पोलीस ठाण्याचे निरीक्षक सुरेंद्र मळाले, गुन्हे शाखेचे निरीक्षक अनिल गायकवाडसह पथकांनी धाव घेतली व घटनास्थळाची पाहणी केली.
