नांदगाव खंडेश्वर / सागर सव्वालाखे
मंदिरे बंद असल्याने, यावर्षी साधेपणात जन्मदिन साजरा
विद्यासागरजी, जैन धर्मातील सर्वात मोठे संत
दिगंबर जैन समाजातील महान संत आचार्यश्री विद्यासागरजी महाराज यांच्या तिथीनुसार जन्मदिवसा निमित्त श्री भारतवर्षीय दिगंबर जैन युवा महासभा, अमरावती जिल्ह्याच्यावतीने ऑनलाईन महाआरती चे आयोजन करण्यात आले होते. कोरणाच्या पार्श्वभूमीवर राज्यभरातील मंदिरे बंद असल्यामुळे गर्दी न करता चार ते पाच श्रद्धालूंच्या उपस्थितीत आचार्यश्रीं विद्यासागरजी महाराज यांची आरती करण्यात आली. श्री भारतवर्षीय दिगंबर जैन युवा महासभा, अमरावती जिल्हाध्यक्ष सागर सव्वालाखे जैन यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर, नांदगाव पेठ, चांदुर रेल्वे, विरुळ रोंघे यांसह अनेक गावात आचार्यश्रींच्या जन्मदिना निमित्य जैन युवामहासभेच्या वतीने आरतीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जैन युवा महासभेचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.
