Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

निकिताच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा द्या, नांदुरा शहर भाजपा महिला आघाडीचे तहसीलदारांना निवेदन

Responsive Ad Here

 देवानंद नेमाने प्रतिनिधी नांदुरा



सोमवारी घडलेल्या हरयाणातील निकिता तोमर हत्या प्रकरणातील प्रमुख आरोपी असणाऱ्या २१ वर्षीय *तौसीफ व त्याच्या सहकाऱ्यांनी २० वर्षीय निकिताचे अपहरण करण्याचा प्रयत्न करून तिच्यावर अमानुषपणे गोळीबार केला. या गोळीबारात जखमी झालेल्या निकिताचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. सदर घटना ही निंदनीय व मानवजातीला काळिमा फासणारी असून या प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी या आशयाचे निवेदन नांदुरा शहर भाजपा महिला आघाडीच्या वतीने शहराध्यक्षा सौ. सारिका राजेश डागा यांच्या नेतृत्वात गुरुवार, दि. २९/१०/२०२० रोजी मा. तहसील साहेबांना देण्यात आले.

भल्लभगढ (हरियाणा) येथील अग्रवाल महाविद्यालयासमोर परिक्षेनंतर घरी जाण्यासाठी निघालेल्या निकिताला मुख्य आरोपी तौसीफ आणि त्याच्या मित्रांनी अडवून तिला गाडीमध्ये बळजबरीने बसविण्याचा प्रयत्न केला. निकिताने त्याला विरोध केल्यानंतर आरोपींनी तिच्यावर गोळीबार केला. त्यात जखमी निकिताला तातडीने जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र उपचारादरम्यान तिची प्राणज्योत मावळली. या घटनेतील मुख्य आरोपी तौसीफने आपला गुन्हा कबुल केला असून हा सर्व घटनाक्रम सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झालेला आहे. सदर प्रकार अतिशय संतापजनक असून या घटनेतील गुन्हेगारांना फाशीची शिक्षा देण्यात यावी,अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली.

यावेळी  नांदुरा शहर भाजपा महिला आघाडीच्या अध्यक्षा सौ. सारिकाताई राजेश डागा, सोशल मिडिया जिल्हा सहसंयोजिका रेणूताई डागा, सरचिटणीस अनिता चौधरी, सचिव आरती नवगजे व सरिता बावस्कार, नगरसेविका शुभांगी झांबरे, बेटी बचाओ बेटी पढाओ संयोजिका ज्योती तांदळे, राष्ट्रीय सेविका समिती संयोजिका विद्या वाणी, सीमा राखोंडे, किर्ती डागा, ब्रह्मानंद चौधरी, उमेश ताकवाले आदी उपस्थित होते. यावेळी सोशल डिस्टन्सिंग च्या सर्व नियमांचे पालन करण्यात आले.