जामनेर प्रतिनिधी
पर्यावरण संतुलनासाठी राज्य शासनातर्फे राबविण्यात येत असलेल्या ' माझी वसुंधरा ' या महत्त्वाकांक्षी अभियानात पहूर ग्रामपंचायतीची निवड झाली असून पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टिकोनातून गावात भरीव कार्य करून जिल्हा , विभाग, आणि राज्य स्तरावर बक्षीस मिळणारच ! असा एकमुखी निर्धार पहूर येथील ग्रामस्थांनी व्यक्त केला .
आज बुधवारी (ता. ११ ) पहूर पेठ , सांगवी , खर्चाणे ग्रुप ग्रामपंचायत कार्यालयात 'माझी वसुंधरा ' प्रभावी अभियानाच्या कार्यवाहीसाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले .कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ नीता रामेश्वर पाटील या होत्या .प्रारंभी ग्रामपंचायतीच्या वतीने मान्यवरांचा स्नेहवस्त्र आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला .यावेळी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प अधिकारी शिरसाठ यांनी मार्गदर्शन केले . बोलताना म्हणाले की , कोणत्याही शासकीय योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी लोकसहभाग महत्त्वाचा असतो .हा लोकसहभाग पहूर पेठ येथे असल्याने नक्कीच पहूर भेट ग्रामपंचायतीला सदर अभियानात उज्ज्वल कामगिरी करण्याची संधी आहे . या संधीचे सोने करण्यासाठी ग्रामस्थांनी एकत्र यावे .
![]() |
| File photo |
जामनेर पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी ज्योती कवडदेवी , विस्तार अधिकारी अशोक पालवे यांनीही योजनेच्या अंमलबजावणीची दिशा स्पष्ट केली . याप्रसंगी माजी जिल्हा परिषद कृषी सभापती प्रदीप लोढा माजी जिल्हा परिषद सदस्य राजधर पांढरे यांनी गावाच्या एकात्मतेचा आणि समर्पित कार्यकर्तृत्वाचा आलेख उपस्थितांसमोर सादर केला .याप्रसंगी पंचायत समिती कृषी अधिकारी आर . एन . पाटील , उपसरपंच श्यामराव सावळे , शेतकी संघाचे साहेबराव देशमुख , अॅड. एस . आर . पाटील , मानवाधिकार समिती उत्तर महाराष्ट्र अधिकारी संतोष पाटील , रविंद्र पांढरे , गणेश पांढरे , किरण खैरणार आदींची प्रमुख उपस्थिती होती .प्रास्ताविक रेल्वे सेंट्रल बोर्ड सदस्य रामेश्वर पाटील यांनी केले . माजी उपसरपंच राजू पाटील यांनी सूत्रसंचालन केले . भारत पाटील यांनी आभार मानले . याप्रसंगी ग्रामपंचायत सदस्य , पत्रकार बांधव , शिक्षक ,अंगणवाडी सेविका, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते . यशस्वीतेसाठी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले .कोरोना विषाणू संक्रमणाच्या अनुषंगाने यावेळी शासकीय नियमांचे पालन करण्यात आले .
