प्रतिनिधी
पहूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राकेशसिंह परदेशी यांची अमळनेर येथे बदली झाल्याने त्यांना पोलीस ठाण्याच्या वतीने भावपूर्ण निरोप देण्यात आला . तसेच नवनियुक्त पोलीस निरीक्षक राहुल खताळ यांचे स्वागत करण्यात आले.
पहूर पोलीस ठाण्यात झालेल्या निरोप आणि स्वागत समारंभाच्या अध्यक्षस्थानी नवनियुक्त पोलीस निरीक्षक राहूल खताळ हे होते . प्रारंभी भारुडखेडा येथीले रेखा अरुण गोसावी यांच्या नेतृत्वा खाली भगीनींनी श्री .परदेशी यांचे औक्षण करून भाऊबीजे पूर्वीच त्यांना भावपूर्ण निरोप दिला . माजी जिल्हा परिषद सदस्य राजधर पांढरे , पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष शरद बेलपत्रे , सरपंच पती रामेश्वर पाटील , चेतन रोकडे आदींनी मनोगत व्यक्त केले .
यावेळी पहूर परिसरातील नागरिकांनी दिलेली अनुभवांची शिदोरी पुढील वाटचालीसाठी दिशादर्शक ठरणार असल्याचे भावोद्गार राकेशसिंग परदेशी यांनी व्यक्त केले . तसेच कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी कायद्याच्या चौकटीत राहून काम करणार असल्याचे नवनियुक्त पोलीस निरीक्षक राहूल खताळ यांनी सांगीतले .
यावेळी विविध संस्था , संघटनांतर्फे सत्कार करून श्री . परदेशी यांना निरोपकरण्यात आला तसेच श्री .खताळ यांचे स्वागत करण्यात आले . यावेळी उपसरपंच श्यामराव सावळे , गणेश पांढरे , समाधान पाटील , विश्वनाथ वानखेडे , भारत पाटील , डॉ .प्रशांत पांढरे , आशिष माळी , रविंद्र मोरे , गौरव राजपूत , संतोष चिंचोले यांच्यासह पोलिस कर्मचारी , विविध संस्थांचे पदाधिकारी , वैद्यकीय अधिकारी , ग्रामस्थ उपस्थित होते . शहर पत्रकार संघटनेचे अध्यक्ष शंकर भामेरे यांनी सुत्रसंचालन केले . पोलीस उपनिरीक्षक संदिप चेडे यांनी आभार मानले .