Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

चिखली विधानसभा क्षेत्रात भगवी लाट तयार करणार - आ. संजय गायकवाड

Responsive Ad Here

देवानंद नेमाने प्रतिनिधी नांदुरा

काल चिखली येथे शिवसेना - युवासेना प्रमुख पदाधिकारी बैठक संपन्न झाली. सदर बैठकीत  नवनियुक्त पंचायत राज समिती अध्यक्ष नामदार संजय रायमुलकर यांचा सत्कार करण्यात आला. त्याचप्रमाणे आमदार संजय जी गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली शिवसेना युवासेना प्रमुख पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली. सदर बैठकीस सहसंपर्कप्रमुख  नरेंद्र खेडेकर भास्करराव मोरे  युवा सेना जिल्हाप्रमुख ऋषी भाऊ जाधव, उप जिल्हा प्रमुख राहीत खेडेकर, नगरसेवक दत्ता सुसर, भास्कर राऊत, शहर संघटक श्रिराम झोरे, कुणाल गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती. 

सदर बैठकीत संपूर्ण उपतालुकाप्रमुख उपशहर प्रमुख विभाग प्रमुख शाखाप्रमुख उपस्थित होते. तर कार्यक्रमाचे आयोजन कपील खेडेकर व शहर प्रमुख निलेश अंजनकर यांनी केले होते. यावेळी चिखली विधानसभा क्षेत्राचा आढावा घेण्यात आला. त्याचप्रमाणे आगामी ग्रामपंचायत नगरपालिका पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणूका मध्ये जास्तीत जास्त विजय कशाप्रकारे संपादन करण्यात येईल यावर सविस्तर मार्गदर्शन आमदार संजय गायकवाड तसेच नामदार संजय जी रायमुलकर यांनी केले. तसेच प्रास्तावीक भाषना मध्ये शहर प्रमुख निलेश अंजनकर यांनी येनार्या  नगरपाली के मध्ये ज्यास्तीत ज्यास्त नगरसेवक निवडुन आनन्याचा निरधार वक्त केला. आपल्या मनोगतात प्राध्यापक नरेंद्र खेडेकर यांनी संपूर्ण मतदारसंघाचा आढावा दिला. 

येणाऱ्या संपूर्ण निवडणुकांमध्ये चिखली विधानसभा क्षेत्रात भगवी लाट निर्माण करणार असे आव्हान आमदार संजय गायकवाड यांनी केले. यावेळी चिखली तालुक्याचे सर्व उप तालुका प्रमुख व युवा सेना ता.प्रमुख नंदु क-हाडे, चिखली युवा सेना शहर प्रमुख विलास घोलप व शिवसेना उप शहर प्रमुख प्रितम गैची, दत्ता देशमुख, समाधान जाध, विकी नकवाल, आकाश महाजन, व युवा सेनेचे उप शहर प्रमुख राहुल शेलकर, सचिन देशमाने, विशाल खरात, अनिल जावरे, तसेच वि.सेना शहर प्रमुख गोलु जायलवास, सतनामसिंह वधवा, सतिश हिवाळे, ऊमेश झोरे, सुनील भराड, विशाल इंगळे, क्षेत्राचे संपूर्ण पदाधिकारी उपस्थित होते.