Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

महाविकास आघाडी सरकार शेतकऱ्याच्या पाठीशी, शेतकऱ्यांनी शासकीय मका खरेदीचा लाभ घ्यावा - आ.राजेश एकडे

Responsive Ad Here

देवानंद नेमाने प्रतिनिधी नांदुरा

यंदा पर्जन्यमान चांगले झाल्याने शेतकरी बांधवांनी मोठ्या प्रमाणात मक्याचे उत्पादन केले आहे. नांदुरा येथे शासकीय मका खरेदी सुरू करावी अशी तालुक्यातील मका उत्पादक शेतकऱ्यांची  मागणी होती.मका उत्पादकांची रास्त मागणी लक्षात घेता आज  मलकापूर विधानसभा मतदार संघाचे आमदार श्री.राजेश एकडे यांच्या हस्ते नांदुरा येथील खरेदी विक्री संघा मार्फत बालाजी जिनिंग  व नांदुरा अग्रो फार्मर प्रोडूसर कंपनी लि.नांदुरा च्या वडी गोडाऊन मध्ये काटा पूजन करून मका खरेदीचा शुभारंभ झाला.

महाविकास आघाडी सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीर पणे उभे असून शेतकऱ्यांनी शासकीय मका खरेदीचा लाभ घ्यावा, अशी भावना आमदार श्री.राजेश एकडे यांनी व्यक्त केली. यावेळी जेष्ठ कांग्रेस नेते श्री.पदमभाऊ पाटील, नांदूरा तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्री.भगवानभाऊ धांडे, शिवसेना उपजिल्हा प्रमुख श्री.वसंतरावजी भोजने, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष श्री.मोहनजी पाटील, जिल्हा काँग्रेस 

कमिटीचे सरचिटनीस श्री.निलेश पाउलझगडे,जिल्हा पुनर्वसन समितीचे सदस्य श्री.पुरूषोत्तम झाल्टे, सहाय्यक निबंधक श्री.महेशजी कृपलानी, नायब तहसिलदार श्री.संजयजी मार्कंड, नांदुरा अग्रो फार्मर प्रोडूसर कंपनी लि.नांदुरा श्री.अमोल धामोडकर, युवा सेनेचे श्री.ईश्वर पांडव, श्री.सागर काटे पाटील व तालुक्यातील शेतकरी प्रामुख्याने उपस्थित होते.