योगेश नागोलकार तालुका प्रतिनिधी पातूर
राहेर:पातुर तालुक्यातील राहेर परिसरात कपाशीवर बोंड अळीचे आक्रमण झाल्याने राहेर येथील शेतकरी चिंतेत सापडला आहे.शेतकऱ्याने बोंड अळीचे नुकसान झाल्याने कृषी विभागाल माहीती दिली असताच यावेळी कृषी विभागाने पुढाकार घेत येथे शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन बोंडअळी नियंत्रणाबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.
यापूर्वी बोंडअळीने मोठ्या प्रमाणात नुकसान केल्यामुळे यंदा कपाशीवर बोंडअळीचा प्रादुर्भाव झाल्यामुळे शेतकरी धास्तावला आहे.याची दखल घेत कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांना प्रत्यक्ष शेतात जाऊन बोंडअळीच्या बंदोबस्तासाठी प्रात्यक्षिकाव्दारे मार्गदर्शन करण्यात येत आहे
.(राहेर)येथील शेतकरी प्रविण उगले,(अडगाव)विजय पाचपोर,धंनजय पाचपोर,(पिपंळखुटा)रामकृष्ण दांदळे,भानुदास दांदळे,भास्कर काळे (चांगेफळ)राजीरामम मोतीराम मोरे ( शिरपूर)व सांगोळा चतारी शेतकरी व (उमरा) माणीक इंगळे,यांच्या व आदी शेतकऱ्यांच्या शेतात बोंडअळीचा प्रादुर्भाव झाल्याने कीड व रोगनिदान होण्याकरीता एकात्मिक कीड नियंत्रणाबाबत तालुका कृषी अधिकारी धंनजय शेटे,जिल्हा परिषद सदस्य पती पंजाबराव पवार, कृषी पर्यवेक्षक नाना हिरोडकार, एम एम.कृषी साहाय्यक शरद पवार,कृषी साहाय्यक अनिल बी सुरवाडे, व यांनी शेतकऱ्यांना बांधावर जाऊन मार्गदर्शन केले.तसेच कपाशीवर बोंससड व करीता बोंडअळीबाबत जनजागृती मोहीम राबविण्यात आली यावेळी शेतकऱ्यांना स्टेप्टोसायक्लिन सल्फेट १ ग्राम,प्रोफेनोफाँस ३० मिली आणी गुलाबी बोंड अळी नियंत्रण करिता क्लोरँनायट्रीपोल,व लँबडासायहेलोथ्रिन ५ मीली व १० मी पाण्यात फवारणी करावी फेरोमोन सापळ्यांचा वापर करावा, डोमकळया शोधूनप नष्ट कराव्या, तसेच निंबोळी अर्क व कीटकनाशकांच्या फवारणीबाबतची माहीती व आवाहन तालुका कृषी अधिकारी कृषी साहाय्यक पातूर यांनी शेतकऱ्यांना दिली.यावेळी विजय दिनेश पाचपोर, पोलीस पाटील,( अडगाव), धंनजय पाचपोर,प्रमोद पाचपोर,प्रविण उगले, जमीरभाई, (राहेर) रामकृष्ण दांदळे, भानुदास दांदळे,सप्पनिल दांदळे,गजानन दांदळे,कपिल दांदळे,पंडित बुंदे (पिपंळखुटा)माणीक इंगळे (उमरा)आदी शेतकरी उपस्थित होते.
