Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

ज्ञानेश्वर कारखाण्याचे ऊसतोडणी हार्वेस्टरखाली सापडून वृद्ध महीला ठार

Responsive Ad Here

नेवासा प्रतिनिधी सागर रासक

ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखाण्याच्या ऊस तोडणी हार्वेस्टरच्या ट्रॉलीखाली सापडून अदिवासी समाजाची महीला ठार झाल्याची घटना गुरुवारी (दि.५) दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास खडका येथे ऊसतोड सुरु असतांना घडली.याबाबत अधिक वृत्त असे की,खडका (ता.नेवासा) येथील संजय विश्वनाथ सावंत यांच्या ऊसाच्या शेतात ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखाण्याच्या हार्वेस्टरने ऊसतोडणी चालू असतांना गुरुवारी दुपारी साडेबारावाजेच्या सुमारास हार्वेस्टरच्या पाठीमागे ऊसाचे टिपरे गोळा करणाऱ्या साखरबाई दामोधर थोरात ही आदिवासी कामगार महिला ट्रॉलीखाली सापडून जागीच ठार झाल्याची घटना घडली. 

File Photo

चालू गळीत हंगाम सुरु झालेला असून हार्वेस्टरच्या पाठीमागे ऊसाची टिपरे गोळा करणाऱ्या महिलाचा हा पहीला बळी गेल्याने खडका शिवारात मोठी हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.या मृतक महिलेचे शवविच्छेदन नेवासा फाटा येथील ग्रामिण रुग्णालयात करण्यात आलेले असून या घटनेचा गुन्हा दाखल करण्याचे काम काम सुरु असल्याची माहीती पोलिस सुञांनी दिली. अधिक तपास पोलिस हवालदार बाळकृष्ण ठोंबरे हे करत आहेत.