Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

महाराष्ट्रातील 21 वर्षीय वीरपुत्र यश देशमुख श्रीनगर हल्ल्यात शहीद

Responsive Ad Here

किरण वाघ प्रतिनिधी बुलढाणा

काश्मीरमधील श्रीनगर येथे दहशतवाद्यांनीभारतीय सैन्यदलाच्या तुकडीवर हल्ला केला आहे. या हल्ल्यात पिंपळगाव येथील जवान यश दिगंबर देशमुख हे शहीद झालेत. प्रशिक्षण झाल्यानंतर गेल्या सात महिन्यापूर्वीच त्यांची पहिलीच पोस्टींग श्रीनगरला  झाली होती. देशाच्या रक्षणासाठी अवघ्या २१ व्या वर्षी आपल्या प्राणांची बाजी लावली. त्यांच्या पश्‍चात आई-वडील, दोन बहीण आणि एक लहान भाऊ असा परिवार आहे.

दहशतवाद्यांनी केलेल्या या हल्ल्यात दोन जवान शहीद झाले आहेत. श्रीनगर जवळील एचएमटी येथे गस्त घालत असलेल्या सैन्य दलाच्या तुकडीवर दहशतवाद्यांनी हल्ला केला. दहशतवाद्यांनी हल्ला करुन पळ काढला आहे. यात चाळीसगाव तालुक्यातील जवान यश दिगंबर शहीद झालेत. काल दुपारी दोन वाजता झालेल्या दहशतवादी हल्ल्यात त्यांना वीरमरण आले. यामुळे गावात शोककळा पसरली आहे. गेल्या दीड वर्षांपूर्वीच यश देशमुख यांची लष्करात रुजू झाले होते.दहशतवाद्यांनी गस्तीवर असलेल्या लष्कराच्या शीघ्र कृती दलावर अंधाधुंद गोळीबार केला. या गोळीबारात यश देशमुख यांच्यासह दोघे जवान गंभीररित्या जखमी झाले. उपचारांदरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

यश यांचे पार्थिव आज त्यांच्या  आणण्यात येणार असून त्यांच्यावर त्यांच्या मूळ गावी शासकीय इतमामात अंतिम संस्कार केल्या जाईल.