नाशिक येवला प्रतिनिधी:- माधव नेह
सध्याची परिस्थिती पाहता महाराष्ट्रातील लाखो तरुण व तरुणी बेरोजगार झालेले आहेत गेल्या सात महिन्यांपासून संपूर्ण महाराष्ट्र व देश पाच ते सहा महिने लॉक डाऊन केला गेला होता परंतु लॉक डाऊन मुळे महाराष्ट्रातील लाखो तरुण व तरुणी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करीत असून त्यांना आता लवकरात लवकर पोलीस भरती व इतर सर्व स्पर्धा परीक्षा घेण्यात यावा .
सध्याची परिस्थिती अत्यंत कठीण झाली असून त्या विद्यार्थ्यांना अतिशय कठीण परिस्थितीचा सामना करण्याची वेळ आज आली आहे गेले पाच ते सहा वर्षापासून अभ्यास व सराव करीत असलेले विद्यार्थी त्यांना गरज निर्माण झालेली असून या गोष्टीचा महाराष्ट्र शासनाने विचार करावा व तसेच शिवसेवा फाउंडेशनचे अध्यक्ष व शिवसेवा करीयर अकॅडमी चे संचालक माननीय श्री कुणाल भावसार यांनी माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब व गृहमंत्री साहेब यांना ऑनलाईन निवेदने पाठवली आहेत
जर वर्षाअखेर पोलीस भरती जाहिरात नाही काढल्यास भावसार यांनी असे सांगितले आहे की महाराष्ट्रातील लाखो तरुण व तरुणी आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला आहे
