काशिनाथ शिंदे जामनेर तालुका प्रतिनिधी
जामनेर दिनांक 11 आज जामनेर येथे नवनिर्मानित महाराष्ट्र रक्षक सेना स्थापन झाल्याने जामनेर पोलिस स्टेशनचे पीएसआय इंगळे साहेब व कर्मचारी यांनी कोरोना महामारी च्या काळात जामनेर तालुक्यात अतिशय उत्तम कामगिरी बजावली असल्यामुळे महाराष्ट्र रक्षक सेनेतर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला .यावेळी इंगळे साहेबांनी महाराष्ट्र रक्षक सेना यांना सदैव मदत करण्यास तयार आहे व माजी सैनिकांसाठी मी अहोरात्र सेवा देण्यास तयार आहे असे इंगळे साहेबांनी सांगितले.
यावेळी उपस्थित तालुकाप्रमुख काशिनाथ शिंदे (माजी सैनिक) उपतालुकाप्रमुख शिवाजी वाघ (माजी सैनिक) कार्याध्यक्ष पवन माळी .महिला प्रमुख मीना शिंदे. महिला उपप्रमुख दर्शना पाटील. जामनेर शहर प्रमुख तुकाराम गोपाळ. तालुका सचिव ईश्वर मावरे( माजी सैनिक) तालुका संपर्कप्रमुख लालचंद चव्हाण. तालुका सल्लागार सुमित चव्हाण. पहूर शहर प्रमुख पंडित पाटील (माजी सैनिक) नेरी शहर प्रमुख रिजवान मन्यार .जामनेर उपशहर प्रमुख पुंडलिक काळे (माजी सैनिक) तालुका संघटक विनोद नाईक आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
