Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

समता सैनिक दलाचे एक दिवशीय बौद्धिक प्रशिक्षण शिबीर संपन्न

Responsive Ad Here

नंदकिशोर इंगळे पापळ प्रतिनिधी 

           अन्यायकर्त्यांपासून लोकांचे संरक्षण करणे, विषमतेच्या शिकवणीला आळा घालणे, समाजात खरी समता प्रस्थापित करणे या उद्देशाने मानवी मूल्यांवर नवसमाजाची निर्मितीसाठी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापना करण्यात आलेल्या समता सैनिक दलाच्या "गाव तिथे शाखा आणि घर तेथे सैनिक" या तत्त्वावर आधारित पार्डी येथे एक दिवशीय बौद्धिक प्रशिक्षण शिबीराचे आयोजन करण्यात आले.

           समाजातील नवतरुण तरुणिंना पुढे येऊन आंबेडकरी चळवळीतील ध्यास बाळगून समाजात नवचैतन्य निर्माण करण्यासाठी  कटिबद्ध राहून संघर्षरत राहून प्रगतशील होण्यासाठी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाचे औचित्य साधून रविवारी १३ डिसेंबर २०२० रोजी सकाळी १०:३० ते ५ या वेळेत पार्डी येथील स्थानिक महाप्रज्ञा बौद्ध विहारामध्ये एक दिवशीय बौद्धिक प्रशिक्षण शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. तिन सत्रांमध्ये पार पडलेल्या या कार्यक्रमाकरिता अध्यक्षस्थानी समता सैनिक दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. कॅप्टन अशोक खनाडे, तर प्रमुख पाहुणे म्हणून पूज्य भन्ते धम्मसार हे होते. कार्यक्रमाचे उद्घाटन समता सैनिक दलाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष मा. मार्शल संजय ओरके यांनी केले.

        प्रबोधनाच्या पहिल्या सत्रात एस एस डी चे नॅशनल काऊन्सिल समन्वयक मा. मार्शल धम्मा कांबळे यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर जीवन आणि मिशन या विषयावर मार्गदर्शन केले तर द्वितीय सत्रात मा. मार्शल संजय ओरके यांनी आंबेडकरी चळवळीतील समता सैनिक दलाची भूमिका स्पष्ट केली. या कार्यक्रमादरम्यानच मंचावर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते समता सैनिक दल नांदगाव खंडेश्वर तालुक्याची कार्यकारिणी गठित करण्यात आली. यामध्ये अध्यक्ष स्थानी मा.विक्की माहोरे तर उपाध्यक्ष स्थानी योगेश बनसोड यांची नियुक्ती करण्यात आली. 

        त्यानंतर गावामधून अभिवादन मार्च काढण्यात आला. सायंकालीन समारोप समारंभ सत्राच्या अध्यक्षस्थानी पूज्य भन्ते धम्मसार तर अतिथी म्हणून महिला विंग्ज समता सैनिक दलाच्या जिल्हाध्यक्ष मा. मार्शल रक्षणाताई सरदार हे होते. या कार्यक्रमाकरिता मार्गदर्शक म्हणून समता सैनिक दलाचे जिल्हाध्यक्ष मा. मार्शल शिलानंद झामरे हे होते. या कार्यक्रमाकरिता परिसरातील बहुसंख्य नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अमरावती जिल्ह्यातील समता सैनिक दलाच्या सर्व मार्शलांनी परिश्रम घेतले.