गणेश महाजन एरंडोल तालुका प्रतिनिधी
एरंडोल येथे 12 रोजी 10.30 वा पासुन न्यायालयात राष्ट्रीय लोक न्यायालयात चे आयोजन करण्यात आले होते.त्यात न्यायालयातील प्रलंबित खटले तसेच नगर पालिका, पंचायत समिती, बी एस एन एल, महावितरण, स्टेट बॅंक ऑफ इंडिया, सेंट्रल बैंक ऑफ इंडिया, बैंक ऑफ बडोदा यांची दाखल पूर्व प्रकरणे तडजोड साठी ठेवण्यात आली त्यापैकी एकूण 79 प्रकरणा मध्ये आपसात तडजोड मोहुन प्रकरणे निकाली काढण्यात आली आणि एकूण 11,04,887 रुपये रक्कम थकबाकी वसूल करण्यात आली. या लोक अदालती चे विशिष्ठ म्हणजे अँड कल्याण पाटील व अँड शेखर खैरनार यांनी व त्यांच्या पक्षकारांनी प्रथमच एरंडोल येथे व्हाट्सअप आणि विडिओ कानफ्रैसिंग या तंत्रज्ञानाचा वापर करून वैवाहीक वादाची दोन प्रकरणे सांमज्यसयाणे मिटविली .उभय पक्षकारांनी एकत्र नांदण्याचा समंजस निर्माण घेतला.
मा.श्री नितेश मनगेणी बंडगर , न्यायादंडाअधिकारी यांच्याकडून प्रकरणे निकाली काढण्यात आली.मा. श्री एस डी जगमलानी , अध्यक्ष जिल्हा विधि सेवा प्राधिकरण, जलगाव.मा.श्री कौ हे ठोंबरे , सचिव,विधि सेवा प्राधिकरण जलगाव यांच्या मार्गदर्शनाखाली व एरंडोल वकील संघाचे मा. वकील वृंद यांच्या सहकार्याने लोक अदालती चे कामकाज पार पडले.
यावेळी न्यायाधिश मा.श्री नितेश एम बंडगर पंच अँड कैलास जी. भाटिया, एरंडोल वकील संघाचे अध्यक्ष हेमराज एम चौधरी, सचिव मनोहर एम महाजन,सहा.अभि.श्री पाटील,व सर्व अँड उपस्थित होते.या लोक अदालती चे यशस्वी साठी वकील संघाचे तसेच नगर पालिका,पंचायत समिती, बी एस एन एल यांच्या सहकार्याने यशस्वी झाले.