Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

पणज परीसरात वन्यप्राण्यांचा धुमाकूळ शेतकरी चिंतेत

Responsive Ad Here

संजय गवळी लोकमत प्रतीनीधी पणज

      अकोट तालुक्यातील ग्राम पणज सह बोचरा परीसरात गेल्या काही दिवसा पासुन वन्यप्राण्यांनी धुमाकूळ घातला असुन शेतकऱ्यांना मात्र चिंता लागली आहे. आता गहु हरभरा पिकांची नुकतीच पेरणी आटोपली व शेतकरी या पिकांच्या आशेवर असुन शेतकऱ्यांना चांगल्या दर्जाचे पिक होणार असे वाटत आहे. 

     परंतु या भागात वन्यप्राणी यांच्या दहशती मुळे शेतकऱ्यांना रात्रीच्या अंधारात शेतात काम करावे लागतो आणि आपला जिव धोक्यात घालून रात्र काढावी लागत आहे.आधीच शेतकऱ्यांना सोयाबीन ज्यारी या पिकांनी दगा दिल्याने शेतात लावलेला खर्च सुद्धा निघाला नसल्याने शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर फटका बसला आहे.

        येणाऱ्या प्रत्येक पिकांची लागवड किंवा मशागत शेतकरी मोठ्या उत्साहात करीत आहेत. पण निसर्गाच्या लहरीपणामुळे आणी वन्यप्राणी यांच्या धुमाकूळाने शेतकरी पुर्णपणे हवालदिल झाला आहे. तसेच शेतकऱ्यांना दिलासा कोण देणार असा प्रश्न निर्माण झाला आहे.