Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

पणज येथील महालक्ष्मी माता मंदिरात मुत्तीँ प्राणप्रतिष्ठा आणी कळस स्थांपना कार्यक्रम संपन्न

Responsive Ad Here

संजय गवळी ग्रामीण प्रतीनीधी पणज

      अकोट तालुक्यातील ग्राम पणज येथील श्री महालक्ष्मी माता मंदिर हे  पणज ग्रामस्थांचे ग्राम दैवत आणी भाविकांचे श्रदास्थान आहे हे मंदिर पुरातन काळापासून असुन बोडीँ नदीच्या काठावर जवळपास 300 वर्षो पासुन आहे बोडीँ नदीच्या काठावर वसलेल्या  या मंदिराच्या समोरच एक पुरातन दिपमाळ व  पायविहीर आहे तसेंच पुरातन काळापासून सर्वत्र महाराष्ट्रात ओळखले  जाणारे हे महाराष्ट्रातील एकमेव जागृत मंदिर आहे   पणज येथील  महालक्ष्मी माता मंदिरात हजारो भाविक महालक्ष्मी मातेच्या दर्शनासाठी पणज नगरीत दाखल होत असतात परंतु या वर्षी सात ते आठ महिने हे मंदिर कोरोनाच्या संकटामुळे बंद होते आता मात्र शासनाने मंदिराला प्रवांगी दिली असुन भाविक दर्शनाचा लाभ घेत आहेत सर्वत्र 

          भारतात  कोरोना या रोगाने धुमाकूळ घातला असुन जनता  शासनाच्या  आदेशाचे काटेकोरपणे पालन  करीत आहेत कोरोनाच्या संकटामुळे आणी  शासनाच्या नियमानुसार कोरोनाच्या बचावासाठी सर्व  सुविधा उपलब्ध आहेत  मंदिरात येणाऱ्या प्रत्येक व्यक्ती ला मास्क लावल्या शिवाय आणी हात पाय धुतल्या शिवाय मंदिरात प्रवेश दिला जात नाही कोरोनाची साकळी तोडण्यासाठी शासन दरबारी मोठ्या प्रमाणात प्रयत्न सुरू आहेत आणी पणज येथील महालक्ष्मी माता मंदिरात शासनाच्या आदेशाचे व नियमांचे काटेकोरपणे पालन केल्या जात आहे सर्वत्र महाराष्ट्रात या मंदीराची एक आगळीवेगळी ओळख  निर्माण झाली  असुन हे मंदिर  महाराष्ट्रात जाग्रुत देवस्थान म्हणून सर्वत्र ओळखले जाते.

             तसेच पणज ग्रामस्थांचे ग्राम दैवत आणी  हजारो भाविकांचे  श्रदास्थान आहे या मंदिरात दिनांक 1 ते 5 डिसेंबर शनिवार दरम्यान  मुतीँ प्राणप्रतिष्ठा कळस स्थांपना महापुजा होम हवन भजन पुजन आरती   या निमित्ताने सतत पाच दिवस महालक्ष्मी माता मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमाची रेलचेल होती आणी विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले या वेळी कार्यक्रमा ला महिला व पुरुष बालगोपाल   तसेच भाविकांची उपस्थिती होती.