Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

रविद्र देशमुख लोणार वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांची दंबग कारवाई

Responsive Ad Here

लोणार :- शेख सज्जाद

लोणार पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र देशमुख यांनी दुचाकी चोरून विकणाऱ्या रॅकेटचा फर्दापाश केला असुन यामध्ये 5 आरोपीना अटक करण्यात आली असुन त्याच्याजवळुन 8 चोरीच्या दुचाकी जप्त केल्या आहे यामध्ये आंतरजिल्हा मधील आरोपीचा समावेश आहे 

लॉकडाउन काळात वाहन तपासणी दरत्यान वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविद्र देशमुख यांनी बिना नबंर च्यागाडया मोठयाप्रमाणात आढळुन आल्या होत्या त्यावेळी त्यांचे संशय काही दुचाकी  स्वरावर होता त्यानी काही महीन्यापासुन त्यावर पाळत ठेवली होती अखेर रविद्र देशमुख यांचा संशय खरा ठराला त्याना याबाबत गोपीनय माहीती मिळाली की बाहेर जिल्हयातुन लोणार येथे गाडया चोरुन आनुन विकल्या जात आहे या घटनेची गंभीरता घेत देशमुख यांनी आपले सहकारी पोहेका सुरेश काळे, पेाहका खनपटे, नापोका राम गिते, पोलीस लेखनिक चंद्रशेखर मुरडकर, पो का कृष्णा निकम , पो का तेजराव भोकरे, पो का विशाल धोंडगे , पो का रविद्र बोरे , पो का विठठल चव्हाण, पो कॉ. गजानन ठाकरे, पो कॉ. ज्ञानेश्वर निकस सुनिल केसकर, गोपनिय विभागाचे संतोष चव्हाण, डि एस बीचे संतोष चव्हाण  याचे पथक तयार करण्यात आले व त्यानी सर्व प्रथम तालुक्यातील सावरगावमुढे ऋषीकेश भिकाराव नागरे वय 19 वर्ष , करण अनिल तारे वय 20 वर्ष रा किन्ही , धिरज संतोष अवसरमोल वय 20 वर्षे रामनगर लोणार यांना चौकशी साठी ताब्यात घेउन त्याच्याजवळील गाडयाची चौकशीकेली असता त्या गाडयाचे नंबर प्लेट बंदलण्यात आले होते असे आढळुनआले त्याच्यावर गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला.

      यामध्ये पोलीसाना यश आले लोणार शहरात 8 गाडया विक्री झाल्याचे निष्पन्न होताच पोलीसानी त्या आठही गाडया जप्त केल्या मात्र या मागचा सुत्रधार पकडण्यासाठी पोलीसानी तारेवरची कसरत करावी लागली कारण की या मधील आरोपी हा आंतरजिल्हयातील असल्यामुळे पोलीसानी सायबर सेलची मदत घेत सायबर सेलचे कर्मचारी राजु पाटील आडवे यांनी वेळोवेळी आरोपीचे लोकेशन देत लोणार पोलीसाना तपासात महत्वाची भुमिका बजावली.

     यावेळी सदर आरोपी हे खतरनाक असल्याची माहीती पोलीसानी मिळाली असता रविद्र देशमुख यांनी पोहेका सुरेश काळे ,यांच्या  सोबतीला ठाण्यातील जवान कृष्णा निकम , रविद्र बोरे सह खनपटे या युवा पोलीसाना पाठविण्यात आले असता परभणी जिल्हयातील प्रताप बाजीराव इंगळे वय 21 रा. बोरगव्हाण ता. पाथरी जि परभणी यांचा अटक केली असे असताना सुध्दा मुख्य सुत्रधार हा पोलीसाच्या हाती लागला नाही पंरतु पोलीसानी हार न मानला तिन दिवस व तिन रात्री एक करून अखेर दिंनाक 18 डिसेबर रोजी मुख्य सुत्रधार गणेश काशिनाथ गायकवाड वय 21 वर्षे रा. बांदरवाडा ता पाथरी जि परभणीयाचा पाठलाग करून त्याला शिताफितीने अटक केली.

        या प्रकरणात एकुण 5 आरोपीचा समावेश असुन या प्रकरणामध्ये आंतरजिल्हा अनेक गुन्हे उघडकीस येण्याची दाट शक्यता आहे पुढील तपास पोलीस अधिक्षक अरविंद चावरीया तसेच अप्पर पोलीस अधिक्षक बजरंग बनसोडे , पोलीस उपविभागीय अधिकारी विलास यमावार यांच्या मागदर्शनाखाली रविद्र देशमुख करित आहे.