पहूर , ता . जामनेर
पहूर येथील वाघूर नदी पुलावर कापसाने भरलेल्या ट्रॅक्टरची ट्रॉली कठड्यावर उलटल्याची घटना आज मंगळवारी (ता. ८ ) सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास घडली . सुदैवानेया अपघातात प्राणहानी टळलीअसली तरी शेतकऱ्याचे मात्र नुकसान झाले आहे . पाळधी येथील शेतकरी योगेश धनगर यांनी येथील जिनिंग-प्रेसिंग येथे सीसीआय कापूस खरेदी केंद्रावर कापूस आणला होता .
मात्र तिथे जागा उपलब्ध नसल्याने कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपबाजार आवारात सदर ट्रॅक्टर लावण्यासाठी ही जात होते .इतक्यात वाघुर नदीच्या पुलावर ट्रॅक्टर ट्रॉली कठड्यावर कोसळली .जेसीबी आणि पोकलेन च्या साह्याने ट्रॉली व्यवस्थित करत असताना दोर तुटले आणि ट्रॉलीतील कापूस वाघुरच्या पाण्यात कोसळल्याने ओला झाला .
जेसीबी आणि पोकलँन्डच्या साह्याने ट्रॅक्टर केले पूर्ववत करण्यात आले . यावेळी पत्रकार गणेश पांढरे , महेश अशोक पाटील यांच्यासह स्थानिक नागरिकांसह पोलीस - होमगार्डस यांनी मदत केली .यावेळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती .वाहतूकही काही काळासाठी ठप्प झाली होती .