Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

एरंडोल येथे शेतकऱ्यांसाठी रास्ता रोको आंदोलनात सहभागी व्हा - काँग्रेसचे आव्हान

Responsive Ad Here

 गणेश महाजन एरंडोल तालुका प्रतिनिधी

केंद्र शासनाने शेतकऱ्यांच्या हितविरुद्ध काळे तीन कायदे बहुमताच्या जोरावर पास केलेले आहेत. त्या काळया कायद्याच्या विरोधात देशातील शेतकरी १० दिवसापासून थंडीतही आंदोलन करीत असून केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करायला तयार नाही.केंद्र शासनाच्या या आडमुठे धोरणाविरोधात देशातील सर्व विरोधी पक्षांनी शेतकऱ्यांच्या आंदोलनास पाठिंबा दिलेला आहे.

File photo

शेतकऱ्यांच्या या आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी व केंद्र शासनाच्या शेतकरी विरोधी कायद्याच्या विरोधात उद्या  दि.०८/१२/२०२० रोजी सकाळी ११ वाजता एरंडोल येथे धरणगाव चौफुलीवर एरंडोल तालुका काँग्रेस च्या वतीने रस्ता रोको करण्यात येत आहे.याप्रसंगी तालुक्यातील सर्व काँग्रेस नेते ,पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी उपस्थित राहावे. तसेच तालुक्यातील सर्व विरोधी पक्षाच्या नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी देखील शेतकऱ्यांच्या हितासाठी या रस्ता रोको मधे सहभाग नोंदवावा असे आवाहन एरंडोल तालुका काँग्रेस कमिटी च्या वतीने करण्यात येत आहे.