Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

भारत बंद ' ला पहूर येथे उत्स्फूर्त प्रतिसाद

Responsive Ad Here

 पहूर ,ता. जामनेर  (प्रतिनिधी) 


        शिवसेना , राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रस तर्फे  शेतकरी कायद्याच्या निषेधार्थ आयोजित करण्यात आलेल्या  ' भारत बंद ' ला पहूर येथे उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला .

         सकाळ पासूनच व्यापारी बांधवांनी आपली दुकाने बंद ठेवली होती .बसस्थानक परिसरात महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी व पदाधिकाऱ्यांनी जोरदार घोषणा देऊन केंद्र सरकारचा निषेध केला .यावेळी पोलीस निरीक्षक राहुल खताळ यांना निवेदन देण्यात आले .

        याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका युवा अध्यक्ष शैलेश पाटील , शिवसेनेचे शहर प्रमुख सुकलाल बारी यांनी मनोगत व्यक्त केले .उपसरपंच श्यामराव सावळे , शिवसेना विभाग प्रमुख गणेश पांढरे , शिवसेना विधानसभा क्षेत्र प्रमुख रवींद्र पांढरे , माजी उपसरपंच रवींद्र मोरे , किरण पाटील , आशिष माळी ,  ईश्वर बारी यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते .पहूर पोलिसांनी यावेळी चोख बंदोबस्त ठेवला होता .