Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

राजूर येथे महापरिनिर्वाण दिनानिमित्त महामानवास अभिवादन

Responsive Ad Here

 बुलढाणा प्रतिनिधी

मोताळा तालुक्यातील राजूर येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 64 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले. यावेळी महाथेरो धम्मज्योती यांच्या हस्ते धूप दीप प्रज्वलित करून सामूहिक बद्धवंदना घेण्यात आली व बाबासाहेबांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. 

यावेळी रतन गवई,मारोती मेढे ,नितीन गवई,शुभम इंगळे,उमेश मेढे ह्यानी मनोगत व्यक्त केले  व बाबासाहेबांच्या कार्यास उजाळा दिला. यावेळी राजूर येथील प्रमोद मेढे, शुभम मेढे, आनंद गवई, वासुदेव मेढे, संतोष मेढे,सुरेश खराटे,सुरंजीत मेढे,विजु सपकाळ ,जितू इंगळे , प्रीतम मेढे, सिद्धू मेढे, सुनिल इंगळे, सुनिल मेढे, सुरज मेढे,विशाल मेढे,अनिकेत यांच्यासह उपासक-उपासिका बहुसंख्येने उपस्थित होते.