बुलढाणा प्रतिनिधी
चिखली तालुक्यातील मौजे टाकरखेड हेलगा येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 64 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले .यावेळी सामाजिक कार्यकर्ते भारत पैठणे यांनी बाबासाहेबांनी दिलेले योगदान उपस्थिताना सांगितले.
यावेळी पोलीस पाटील अनंता पैठणे ,वन समितीचे किशोर गुंजकर ,पुरुषोत्तम हेलगे, सतीश पाटील, दिलीप हेलगे ,अंकुश गुंजकर ,प्रल्हाद पैठणे , यादव गवई ,दिलीप पैठणे यांच्यासह अनेक उपासक व उपासीका उपस्थित होते.
