Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

नांदगाव खंडेश्वर येथे कडकडीत भारत बंद व चक्काजाम यशस्वी

Responsive Ad Here

नंदकिशोर इंगळे नांदगाव खंडेश्वर:(तालुका प्रतिनिधी)

        केंद्र सरकारने पारित केलेले तीन शेतकरीविरोधी काळे कायदे रद्द करण्यात यावे या मागणीसाठी दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या महाआंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आयोजित दिनांक ८ डिसेंबरचा भारत बंद नांदगाव खंडेश्वर येथे कडकडीत बंद करण्यात आला व  बस स्थानक येथे रास्तारोको आंदोलन करण्यात आले. नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील शेतकरी वर्गाने व सर्वसामान्य प्रचंड संख्येने सहभागी झाली. तालुक्यातील सर्व विरोधी पक्ष व संघटनांनी संयुक्तपणे या आंदोलनामध्ये सहभाग घेतला. 

    या आंदोलनात नांदगाव खंडेश्वर येथील सर्व प्रतिष्ठाने व दुकाने बंद ठेवण्यात आली. शेतकऱ्यांच्या शेतीमालाच्या खरेदीसाठी सर्व कंपन्या, बहुराष्ट्रीय कंपन्यांना खुली सूट देऊन शासकीय बाजार समित्या संपुष्टात येणार आहेत. त्याला पर्याय खासगी बाजार समिती स्थापन करण्यास सरकारने परवानगी दिली आहे. त्यामुळे नजीकच्या काळात सरकारी बाजार समित्या स्पर्धेमध्ये टिकणार नाही व त्याची जागा खाजगी बाजार समित्या घेतील आणि हळूहळू भांडवलदार व खाजगी व्यापाऱ्यांची मक्तेदारी कृषिमालाच्या खरेदीमध्ये निर्माण होणार आहे. त्याचप्रमाणे शेतीमालाला जीवनावश्यक वस्तूंच्या यादीतून वगळून शेतमालाची कितीही  अमर्यादा साठवणूक करण्यास केंद्र सरकारच्या नव्या कायद्याने परवानगी दिली आहे. त्यामुळे भविष्यात प्रचंड महागाई वाढण्याचा व सर्वसामान्य जनतेला फटका बसण्याचा धोका निर्माण झाला आहे. सध्याच्या परिस्थितीत चालू असलेला काळाबाजार यापुढे अधिकृत होईल आणि त्यात आणखी भर पडणार आहे.

       त्यामुळे साठेबाजी करून धनिक वर्ग व भांडवलदार अधिक नफा कमावण्यासाठी या क्षेत्रात उडी घेणार आहेत. शेतीच्या कंपनीकरणाला व कंत्राटीकरनाला केंद्र सरकारने कायद्याद्वारे खुली सूट दिल्यामुळे बहुराष्ट्रीय कंपन्या या क्षेत्रात उतरणार आहेत.परंपरागत शेतीवर अवलंबून असलेला व शेतीला आपली माय समजणारा शेतकरी वर्ग यामुळे संतप्त झाला आहे.शेतीला शेतकरी काळी आई संबोधतो व त्या प्रकारे तिची सेवा करतो, मात्र शेतकऱ्यांच्या काळ्या आईला भांडवलदारांना दावणीला बांधण्याचा घाट सरकारने घातल्यामुळे शेतकरी वर्गाला हा आत्मसन्मानाचा आणि इज्जतीचा प्रश्न म्हणून वाटत आहे. त्यामुळेच शेतकरी वर्ग या कायद्या विरुद्ध वैचारिक आणि भावनात्मक दृष्ट्या एकजूट करत आहे.त्यामुळे जोपर्यंत केंद्रातील मोदी सरकार हे तीनही काळे कायदे रद्द करणार नाही तोपर्यंत हे आंदोलन मागे घेतले जाणार नाही असा निर्धार शेतकर्‍यांनी केला आहे. जसजसे सरकार या आंदोलनाकडे दुर्लक्ष करेल तसे आंदोलनाची व्याप्ती गाव खेड्यापर्यंत व शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत पोहोचणार आहे आणि हे आंदोलन अधिक व्यापक आणि अभूतपूर्व होणार आहे. त्यामुळे शेतकरी वर्गाने या आंदोलनात तन-मन-धनाने सहभाग घेतला. 


        भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष,शिवसेना, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना,वंचित बहुजन आघाडी, विदर्भ शेतकरी संघर्ष समिती तसेच अखिल भारतीय किसान सभा, महाराष्ट्र राज्य किसान सभा, भारतीय खेत मजदूर युनियन, भारतीय महिला फेडरेशन,ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशन,ऑल इंडिया यूथ फेडरेशन, डेमोक्रेटिक फेडरेशन ऑफ इंडिया,स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया आदि पक्ष, जन संघटनांचे कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले.या आंदोलनात माजी आमदार विरेंद्र जगताप, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सचिव काॅ.तुकाराम भस्मे, महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार फेडरेशनचे राज्याध्यक्ष,संजय मंडवधरे,  भाकपचे अमरावती जिल्हा सचिव, सुनील मेटकर, तालुका सचिव संतोष सुरजुसे, हरिदास राजगिरा, विनोद तरेकर,प्रफुल देशमुख, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे नांदगाव खंडेश्वर तालुका अध्यक्ष दीपक सवाई, शहराध्यक्ष अमोल धवसे, शिवसेना तालुका प्रमुख, विष्णुपंत तीरमारे,शहर प्रमुख अरूण लहाबर,  मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे  तालुका सचिव श्याम शिंदे, शहर सचिव मोहसिन खान ,शिवसेनेचे ओंकार ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अरविंद चोरे,अथर खान,शहराध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष प्रा. नितीन टाले, राहुल दहातोंडे,छोटूभाऊ मुंदे,प्रफुल वसुकार,विदर्भ शेतकरी समिती, उमेश चौकडे, रविभाऊ पडोळे,स्वाभिमानी शेतकरी संघटना, तसेच दिपक भगत, इत्यादी पदाधिकारी व सर्वसामान्य जनता सहभागी झाली होती.