Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

येवला तालुक्यातील पाटोदा येथे अन्यायकारक क्रृषी कायद्याच्या निषेधार्थ केंद्र सरकारच्या पुतळ्यास चपलांचा हार घालून शेतकरी संघटना व प्रहार संघटना निषेध करत आंदोलन

Responsive Ad Here

 येवला प्रतिनिधी माधव नेहे

      केंद्र सरकारच्या येऊ घातलेल्या कृषी विधेयकास विरोधकरण्यासाठी पंजाब व हरियाणातील शेतकऱ्यासह देशभर गेले दहा,बारा दिवस विविध प्रकारे आंदोलन चालू असून केंद्र सरकार त्यावर उपाययोजना करण्याच सोडून हरप्रकारे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करतय याचा निषेध. 

        आज ८/१२/२०२० रोजी भारत बंद चे आवाहन विविध शेतकऱ्यांच्या संघटनांनी केले असून प्रहार संघटना या आंदोलनात सक्रिय सहभागी होऊन पाटोदा ता.येवला येथे अन्यायकारक कृषी कायद्याच्यानिषेधार्थ केंद्र सरकारच्या पुतळ्यास बेशरमच्या फुलांचा व चपलांचा हार घालून निषेध करत आंदोलन करण्यात आले असून सर्वांनी या आंदोलनात सहभागी होऊन अन्नदात्या प्रति संवेदना व्यक्त कराव्यात असे आव्हान येवला तालुका प्रहार शेतकरी संघटना अध्यक्ष हरिभाऊ महाजन व प्रहार जनशक्ती अध्यक्ष अमोलभाऊ फरताळे यांनी यावेळी उपस्थित शेतकऱ्यांना केले.

        या वेळी हरिभाऊ महाजन, अमोल फरताळे किरण चरमळ वसंतराव झांबरे,जगदिश गायकवाड,सागर गायकवाड,अंकुश कदम,गणेश लोहकरे,सचिन पवार,विष्णु पवार,सतिष ठाकरे,अरुण मुरकुटे,सागर गायकवाड,महबुब शेख, शंकर गायके,रामभाऊ नाईकवाडे,गोरख निर्मळ,रामदास ईंगळे,सुनिल पाचपुते,खंडु कुंभारकर,चेतन बोरणारे,किशोर भोसले,धनंजय खरोटे शिवाजी निकम,शाम मेंगाणे,संदिप नाईकवाडे, ऋषिकेश मेंगाणे, यांचेसह शेकडो शेतकरी उपस्थित होते