अमरावती प्रतिनिधी
२० डिसेंबर पर्यंत धामणगाव रेल्वे मतदारसंघा सह अमरावती जिल्ह्यातील रेती घाटांचे लिलाव होणार. सामान्य जनतेला बेभाव रेती घ्यावी लागत असल्याने घरकुलची कामे बंद आहेत. त्यामुळे लवकरात लवकर रेती घाटाचे लिलाव व्हावे म्हणून आमदार प्रताप अडसड यांनी सातत्याने केला पाठपुरावा.
आज मुंबई येथे पर्यावरण प्रधान सचिव यांच्याशी आमदार प्रतापदादा अडसड यांनी भेट घेतली व अमरावती जिल्ह्यातील रीती घाट तातडीने सुरू करण्यासंदर्भात चर्चा झाली यावेळी प्रधान सचिव यांनी येत्या 20 डिसेंबरपर्यंत रेती घाटाचे लिलाव करण्यासंदर्भात आश्वासन दिले.
