Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

भुमिपुत्र शेतकरी प्रोडूसर कंपनी मार्फत शेतकऱ्यांना अनुदान तत्वावर ट्रॅक्टर व शेती अवजारे वाटप

Responsive Ad Here

 संदीप तूर्केल प्रतिनिधी चंद्रपूर

    राजुरा तालुक्यात स्थित भूमिपुत्र शेतकरी प्रोड्युसर कंपनी लिमिटेड ची स्थापना राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक (नाबार्ड) च्या मदतीने व नवदृष्टी महिला विकास संस्था चंद्रपूर यांच्या सहकार्याने करण्यात आली. कंपनीमध्ये 300च्या वर शेतकरी भागदार असून त्यांनी मिळून सदर कंपनीची स्थापना केली आहे. नुकतेच भूमिपुत्र शेतकरी प्रोड्युसर कंपनी मार्फत आठ शेतकऱ्यांना शासनाचा खनिकर्म विभागाच्या निधीतून अनुदान तत्वावर ट्रॅक्टर, टिलर, पावर सप्रायर, पंप, रिपिअर चे वाटप करण्यात आले.

       यावेळी नाबार्डचे जिल्हा विकास अधिकारी अजिनाथ टेले, नवदृष्टी महिला विकास संस्थेचे संचालक निलेश देवतळे, भूमिपुत्र शेतकरी प्रोड्युसर कंपनीचे अध्यक्ष राजजीवन वाघमारे, कंपनीचे सीईओ संप्रज्ञ वाघमारे, माजी बँक व्यवस्थापक कासलवार, नवदृष्टी संस्थेचे प्रकल्प समन्वयक अक्षय देशमुख, कंपनीचे सदस्य, ट्रॅक्टर लाभधारक व शेतकरी उपस्थित होते.