Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

वीरजवान अमित पाटील यांच्या कुटूंबियांचे पालकमंत्र्याकडून सात्वंन

Responsive Ad Here

 जळगाव प्रतिनिधी

        दिनांक 22 - कर्तव्य बजावत असताना वीरगती प्राप्त झालेले चाळीसगाव तालुक्यातील वाकडी येथील जवान अमित पाटील यांच्या कुटूंबियांची आज राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी भेट घेऊन सात्वंन करुन शोक व्यक्त केला.  जम्मूमधील पूंछ भागात कर्तव्य बजावत असताना वाकडी गावचे सुपुत्र, सीमा सुरक्षा दलातील जवान अमित पाटील यांना 16 डिसेंबर रोजी वीरगती प्राप्त झाली. आज पालकमंत्री ना. पाटील यांनी वीरजवान अमित पाटील यांच्या मुळगावी वाकडी येथील घरी जाऊन त्यांचे वडिल साहेबराव पाटील, आई सकुबाई पाटील, पत्नी वैशालीताई पाटील, भाऊ, बहिण व मुलांची भेट घेऊन त्यांचे सात्वंन केले.

       वीरजवान अमित पाटील यांना भारतमातेची सेवा करीत असताना वीरगती प्राप्त झाली आहे. त्यांनी देशाच्या सेवेसाठी दिलेले बलीदान व्यर्थ जाणार नाही अशा भावना व्यक्त करुन पालकमंत्री ना. पाटील म्हणाले की, वीरजवान अमित पाटील यांच्या कुटूंबियांना शासनातर्फे सर्वोतोपरी मदत करण्यात येईल. यावेळी पालकमंत्र्यासमवेत शिवसेनेचे उपजिल्हा संघटक महेंद्र पाटील, तालुका प्रमुख रमेश पाटील, प्रसिद्ध प्रमुख दिलीप घोरपडे, शहर प्रमुख नानभाऊ कुमावत, भावडू गायकवाड, नकुल पाटील, मोती आप्पा पाटील, निलेश गायके व वसीम चेअरमन यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.