गणेश महाजन एरंडोल तालुका प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा खासदार शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त तालुका राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे महारोजगार मेळाव्यात सुशिक्षित तरुणांची ऑनलाईन नोंदणी, वृक्षारोपण, व ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना फळ वाटप व वृक्षारोपण इत्यादी उपक्रम राबविण्यात आले.
सदर कार्यक्रम प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस तालुका अध्यक्ष प्राध्यापक मनोज पाटील, जिल्हा सरचिटणीस राजेंद्र देसले शहराध्यक्ष तथा नगरसेवक नितीन चौधरी उमेश देसले एडवोकेट अहमद सय्यद, किशोर पाटील,नरेश भोई,डॉक्टर प्रशांत पाटील,एन.डी.पाटील, नगरसेविका वर्षा शिंदे,मंजुषा देसले,अजित बारी,सुनील चौधरी, ईश्वर बिऱ्हाडे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

