नंदकिशोर इंगळे नांदगाव ख.(प्रतिनिधी)
आयटीसी कंपनी च्या सामाजिक दायित्वातून आयटीसी मिशन सुनहरा कल अंतर्गत शाश्वत शेती विकास प्रकल्पाची अंमलबजावणी अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खं., भातकुली व अमरावती तालुक्यातील निवडक गावांमध्ये होणार आहे. यामध्ये प्रामुख्याने शेतीशाळेच्या माध्यमातून आधुनिक शेती तंत्रज्ञान गावात विकसित करने व शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ करणे, महिला बचत गटाचे कृषी अवजार बँक केंद्र उभे करणे व त्यासोबतच ग्रामीण भागातील बचत गटांच्या महिलांना कृषी उद्योजक तयार करण्याचे व त्यांची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे काम बायफ च्या वतीने होणार आहे.
त्याअनुषंगाने या रब्बी हंगामात श्री.आनंद भारतीय, सहायक कार्यक्रम अधिकारी अमरावती- बायफ यांच्या मार्गदर्शनाखाली नांदगाव खं. मधील २० गावांची निवड सिएसव्ही अंतर्गत केली असून त्या गावामध्ये गहू व हरभरा पिकाच्या महिला शेतकऱ्यांच्या शेतीशाळा ह्या डेमो निवडलेल्या प्लॉटवर होणार आहेत, व त्याची अंमलबजावणी गावातीलच उमेदच्या कृषी सखी/सीआरपी ;आयटीसी ने तयार केलेल्या पिक व्यवस्थापन मोडुलचा वापर करून आधुनिक शेती तंत्रज्ञानाचे धडे गावामध्ये शेतकऱ्यांपर्यंत पोहचवणार आहेत. या रब्बी हंगामाच्या निमित्ताने नांदगाव मधील गावामध्ये गहू व हरभरा पिकाच्या प्रात्यक्षिक शेतीशाळेच्या आयोजनासाठी नियोजन-आढावा व कृषी सखी/सीआरपी चे प्रशिक्षण सुद्धा मौजे पापळ येथे दिनांक २३ नोव्हेंबर रोजी संपन्न झाले असून, यावेळी सदर प्रशिक्षणाला श्री.उमेश शर्मा,वरिष्ठ अधिकारी बायफ, श्री.जयेंद्र ढोके उमेद कक्ष नांदगाव,श्री. राहुल इंगोले,जिल्हा कार्यक्रम अधिकारी बायफ श्री. तुषार नंदेश्वर,डिपीओ बायफ व गावातील कृषी सखी/सीआरपी आदी उपस्थित होते.
