Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

मुख्याध्यापक संघाची त्रिवार्षिक निवडणूक बिनविरोध संपन्न

Responsive Ad Here

गणेश महाजन एरंडोल तालुका प्रतिनिधी

     रा.ति.काबरे माध्यमिक विद्यालयात आज दि. 25 रोजी एरंडोल तालुका मुख्याध्यापक संघाची त्रिवार्षिक निवडणूक बिनविरोध संपन्न झाली.तालुक्यातील सर्व मुख्याध्यापकांनी एकमताने म.ध.पाटील माध्यमिक विद्यालयाचे क्रियाशील मुख्याध्यापक आदरणीय दादासो.राजेंद्र टी.पाटील सर यांची पुन्हा दुसऱ्यांदा बिनविरोध एरंडोल तालुका मुख्याध्यापक संघ अध्यक्ष पदी निवड केली. तसेच उपाध्यक्ष पदी रा.ति.काबरे विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ.रोहिणी मानुधने यांची निवड करण्यात आली  व सचीव पदी गौरीशंकर माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक दादासो. सानप सरांची निवड करण्यात आली.

     या निवडणुकित निवडनुक निरीक्षक म्हणून आनोरे येथील मुख्याध्यापक चौधरी सर यांनी कामकाज पाहिले . या प्रसंगी तालुक्यातील सर्व माध्यमिक विद्यालयांचे मुख्याध्यापक उपस्थित होते. या प्रसंगी विखरण शाळेचे मुख्याध्यापक श्री.बी.वाय. पाटील सर व ताडे माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक दादासो मराठे आण्णा व भारती विद्यामंदिर कासोदा येथील श्याम सर यांनी मनोगते व्यक्त केली. सुत्रसंचालन व आभार भारती विद्यामंदिर कासोदा येथील मुख्याध्यापक दादासो.श्री. ठाकरे   सरांनी केले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी श्री.ए.आर.पाटील, श्री.डी.बी.पाटील सर, श्री.महेंद्र पाटील सर व भैय्याभाऊ अहिरे यांनी परीश्रम घेतले