किरण वाघ प्रतिनिधी बुलढाणा
ज्या विद्यार्थ्याचे आधार कार्ड क्रमांक NPCI मॅपव्दारे लिंक झालेले नाहीत अशा विद्यार्थ्यांची यादी महाविद्यालयांना ई-मेल व्दारे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य कार्यालयाकडून पेन ड्राईव्हमध्ये व व्हाटसअप ग्रुपवर देण्यात आलेली आहे. अशा महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांना आपले आधार क्रमांक NPCI मॅपव्दारे बँकेशी लिंक करुन घेऊन शिष्यवृत्ती प्रोफाईल अद्यावत करुन घेण्याबाबत विद्यार्थ्यांना अवगत करावे. विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती तात्काळ त्यांच्या बॅंक खाती जमा होईल, यादृष्टीने आवश्यक ती कार्यवाही करावी.
तसेच सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या सूचनांप्रमाणे कार्यप्रणालीचा अवलंब करुनही अथवा न करता अनुसूचित जाती, इमाव, विजाभज व विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थ्याचे अर्ज प्रलंबित राहून विद्यार्थी शिष्यवृत्ती पासून वंचित राहिल्याचे निदर्शनास आल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी जिल्ह्यातील संबंधित शासन मान्यता प्राप्त अनुदानित, विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित महाविद्यालयांचे प्राचार्य यांच्यावर राहील, असे सहायक आयुक्त, समाज कल्याण यांनी कळविले आहे.
