हिवरखेड प्रतिनिधी:-जितेश कारीया
अकोला जिल्ह्याचे लोकप्रिय पालकमंत्री बच्चुभाऊ कडू यांनी दिनांक 5 जानेवारी मंगळवार रोजी हिवरखेड येथे धावती भेट दिली. भेटीदरम्यान त्यांनी प्रहार कार्यकर्त्यांसह बुलेट वरून हिवरखेड गावाचा फेरफटका मारून परिस्थितीचा आढावा घेतला.
येत्या पंधरा तारखेला हिवरखेड ग्रामपंचायतीच्या निवडणुका होणार असून प्रहार आणि शिवसेना प्रणित प्रहार युवा क्रांती पॅनल सुद्धा सर्व नवीन चेहऱ्याचे उमेदवार उभे करून ग्रामपंचायत निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. दिनांक 5 जानेवारी रोजी अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री बच्चू कडू यांनी हिवरखेड येथे घुंगड यांच्या निवासस्थानी आकस्मिक भेट देऊन प्रहार आणि शिवसेना प्रणित प्रहार युवा क्रांती पॅनलच्या उमेदवार आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधून त्यांचा उत्साह वाढविला आणि हिवरखेड ग्रामपंचायतीवर प्रहारचा झेंडा फडकविण्याचे आवाहन केले.
मोठे बॅनर लावण्यापेक्षा लोकांची कामे करून लोकांच्या मनात मोठी जागा बनविने हे प्रहारचे प्रमुख लक्ष असल्याचा मूलमंत्र त्यांनी कार्यकर्त्यांना दिला. हिवरखेड परिसरात प्रहार चे वाढते प्रस्थ पाहून त्यांनी समाधान व्यक्त केले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते आणि पत्रकार बांधवांनी हिवरखेड नवीन तालुका निर्मिती, नगरपंचायत निर्मिती आणि हिवरखेड विकासाशी संबंधित महत्त्वाच्या मुद्द्यांवर पालकमंत्र्यांशी संवाद साधला. त्यावर पालकमंत्र्यांनी सर्व मुद्द्यांवर सकारात्मक प्रयत्न करण्याचे आश्वासन उपस्थितांना दिल.
पालकमंत्र्यांच्या हिवरखेड भेटीदरम्यान सुशील पुंडकर,गजानन भाऊ ताळे गोपाल घुंगड, शिवम भटकर रवी घुंगड, पवन गावत्रे मंगेश पाटील ताळे, सुमित ढबाले, विक्की धांडे,आकाश इंगळे, गणेश वानखडे, सुशील इंगळे, इत्यादींसह शेकडो कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. रवी घुंगड (राणा) आणि कार्यकर्त्यांनी हिवरखेड ग्रामपंचायत मध्ये झालेल्या 50 लक्ष रुपयांच्या वर भ्रष्टाचाराची सखोल चौकशी झालेली असून आरोपींवर तात्काळ कार्यवाही करण्याची मागणी बच्चुभाऊ कडू यांच्याकडे यावेळी केली. आता 50 व 5 लाखाच्या वरील भ्रष्टाचार प्रकरणी काय कारवाई होते याकडे जनतेचे लक्ष लागले आहे.
