Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

नांदुरा शहर भाजपा महिला आघाडीच्या वतीने तिळगुळ वाटप कार्यक्रम संपन्न

Responsive Ad Here

देवानंद नेमाने प्रतिनिधी नांदुरा

   भारतीय सण व उत्सवांच्या माध्यमातून समाजात ऐक्य व सलोखा कायम रहावा हा दृष्टीकोन डोळ्यांसमोर ठेवून तसेच मकर संक्रांतीचे औचित्य साधून गुरुवार, दि. १४/०१/२०२१ रोजी नांदुरा शहर भाजपा महिला आघाडीच्या वतीने *स्नेहमय तिळगुळ वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शहराध्यक्षा  सौ. सारिका राजेश डागा यांच्या मार्गदर्शनात महिला आघाडीच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्या यांच्या वतीने शहरातील  प्रशासकीय व सरकारी कर्मचारी, पोलीस कर्मचारी तसेच जेष्ठ व इतर नागरिकांना तिळगुळ वाटप करून तसेच  'तिळगुळ घ्या व गोड गोड बोला' असा स्नेहमय संदेश देत भारतीय पारंपरिक पद्धतीने मकर संक्राती उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला.

      यावेळी नांदुरा शहर भाजपा महिला आघाडीच्या वतीने मकर संक्रातीच्या शुभ प्रसंगी सामाजिक बांधिलकी जपत ग्राम दहिगाव ता. नांदुरा  येथील श्री गाडगे महाराज वृद्धाश्रमाला भेट देऊन तेथील वृद्धांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. वृद्धांना तिळगुळ देऊन त्यांचे आशीर्वाद घेण्यात आले.  मकर संक्राती सण सर्वांच्या आयुष्यात आनंद व समृद्धी घेऊच यावा अशी प्रार्थना यावेळी करण्यात आली.या सामाजिक उपक्रमामध्ये भाजपा महिला आघाडी अध्यक्षा सौ. सारिका राजेश डागा, जिल्हा सोशल मीडिया सहसंयोजिका सौ. रेणूताई डागा, सचिव सरिता बावस्कार, प्रज्ञा तांदळे, सपना मोरे , तृप्ति तांदळे आदींनी सहभाग नोंदविला होता.