Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

गणोजा देवी येथे श्री महालक्ष्मी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री प्रशांतभाऊ लढके यांच्या हस्ते प्रजासत्ताक दिना निमित्त ध्वजारोहन

Responsive Ad Here

 अमरावती प्रतिनिधी 

      *ग्रामपंचायत कार्यालय गणोजा देवी येथील प्रजासत्ताक दिना निमित्त  ध्वजारोहन ग्रामपंचायत गणोजा देवी येथील प्रशासक तथा विस्तार अधिकारी पंचायत समिती भातकुली चे मा.श्री प्रल्हादजी तेलग साहेब यांच्या शुभ हस्ते करण्यात आले*

(1) दि. 26 जानेवारी 2021 रोजी गणोजा देवी येथील श्री महालक्ष्मी शिक्षण संस्थेच्या प्रांगनामध्ये संस्थेचे अध्यक्ष मा. श्री प्रशांत भाऊ लढके माजी सरपंच यांच्या शुभ हस्ते ध्वजारोहन करण्यात आले तेव्हा सन्माननीय सर्व सद्स्य तसेच गावातील नागरिक प्रमुख अतिथी म्हणून लाभलेले  ग्रामपंचायत गणोजा देवी येथील प्रशासक तथा विस्तार अधिकारी पंचायत समिती भातकुली चे मा. श्री प्रल्हादजी तेलग साहेब तसेच ग्रामपंचायत गणोजा देवी चे ग्रामविकास अधिकारी मा. श्री राजेंद्र धरमठोक साहेब यावेळी ध्वजा रोहन कार्यक्रमा ला उपस्थित होते.


   (2) तसेच ग्रामपंचायत कार्यालय गणोजा देवी येथील ध्वजारोहन मा. श्री प्रल्हादजी तेलग साहेब प्रशासक तथा विस्तार अधिकारी पंचायत समिती भातकुली यांचे शुभ हस्ते  हस्ते करण्यात आले. तेव्हा गणोजा देवी सर्व ग्रामवाशी यावेळी कार्यक्रमा ला उपस्थित राहुन सर्व नागरिकांनी प्रजासत्ताक  दिनाच्या शुभेच्छा दिल्या त्यानंतर ग्रामपंचायत गणोजा देवी चे प्रशासक तथा विस्तार अधिकारी पंचायत समिती भातकुली मा श्री तेलंग साहेब  यांची सहायक गटविकास अधिकारी पंचायत समिती भातकुली येथे नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचा मा. श्री प्रशांतभाऊ लढके अध्यक्ष श्री महालक्ष्मी शिक्षण संस्था तथा माजी सरपंच यांच्या हस्ते शॉल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार  ग्रामपंचायत कार्यालय येथे सर्व ग्रामवासीयांच्या समवेत करण्यात आला. 

    तसेच गणोजा देवी ग्रामपंचायतला उत्कृष्ट कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून लाभलेले ग्रामपंचायत  गणोजा देवी चे ग्रामविकास अधिकारी राजेंद्र धरमठोक साहेब यांनी गावात केलेल्या उत्कृष्ट कामगिरी बद्दल यांचा सुद्धा शॉल श्रीफळ व पुष्प देऊन गणोजा देवी येथील युवा सामाजिक  कार्यकरता सौरभ अशोकराव गुल्हाने यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच मा. प्रल्हादजी तेलंग साहेब प्रशासक यांनी नवनिर्वाचित सर्व ग्रामपंचायत सदस्याचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले आणि त्यांना पुढील कार्याकरिता योग्य मार्गदर्शशन करून आपले कर्तव्य पार पाडले तेव्हा समस्त गावकरी आणि ग्रामपंचायत चे सर्व कर्मचारी तसेच पोलीस पाटील, तलाठी, कोतवाल, अंगणवाडी सेवका, आशा वर्कर, आरोग्य सेविका आणि गावातील युवा सामाजिक सर्व कार्यकर्ते प्रजासत्ताक दिना निमित्त ग्रामपंचायत कार्यालय गणोजा देवी येथे  उपस्थित होते.