अमरावती प्रतिनिधी
*उपशिक्षणाधिकारि अनिल कोल्हे शिक्षण विभाग माध्यमिक यांनी महासरस्वती विद्यालय गणोजा देवी चा अहवाल सादर न केल्यामुळे गणोजा देवी येथीलनागरिकानी केली उपसंचालक अमरावती यांच्याकडे दाखल केली लेखी तक्रार*
*शिक्षणाधिकारी जी. प. अमरावती यांनी गणोजा देवी येथील नागरिकांच्या दि. 6/8/2019व दि. 17/1/2020 रोजच्या तक्रार अर्जानुसार सात दिवसात अहवाल सादर करण्याकरिता उपशिक्षणाधिकारी अनिल कोल्हे यांना दि 15/9/2020 रोजी दिले पत्र*
दि. 25 जानेवारी 2021 रोजी मा. शिक्षण उपसंचालक अमरावती यांच्याकडे गणोजा देवी येथील नागरिकांनी तक्रार दाखल केली कि दि. 6/8/2019 व दि. 17/1/2020 रोजी दोन तक्रार अर्ज गावातील नागरिकांनी महासरस्वती विद्यालय या शाळेची इमारत शिकस्त असल्यामुळे त्या शाळेची तपासणी करण्यात यावी व महासरस्वती विद्यालय येथे प्रशासकीय राजवट सुरु ठेवण्याबाबत असे दोन तकार अर्ज शिक्षणाधिकारी अमरावती यांच्याकडे दाखल केले होते परंतू संबंधित अधिकारी यांनी गावकऱ्याच्या तक्रार अर्जाची दखल अजूनपर्यन्त घेतली नाही आणि त्यानंतर शिक्षनाधिकारी यांनी दि. 15/9/2020 रोजी अनिल कोल्हे उपशीक्षणाधिकारी यांना सात दिवसात महासरस्वती विद्यालय गणोजा देवी येथे जाऊन चौकशी अहवाल सादर करण्यास सांगितले असता कोल्हे यांनी शिक्षणाधिकारी यांच्या आदेशाचे पालन न करता त्यांना विचारना केली असता कोल्हे यांनी उडवाउडवीची उत्तर देणे सुरु केले तेव्हा दि. 25/1/2021 रोजी अनिल कोल्हे यांच्या विरुद्ध शिक्षण उपसंचालक अमरावती यांच्याकडे गणोजा देवी नागरिकांनी लेखी तक्रार सादर केली आहे. आता न्याय मिळेल कि नाही यावर नागरिकांनाचे लक्ष आहे. दिलेल्या तक्रार अर्जानुसार कोल्हे यांच्यावर कार्यवाही न झाल्यास शिक्षण उपसंचालक अमरावती यांच्या कार्यालय समोर तीव्र आंदोलन तसेच उपोषणास बसण्याचा इशारा या तक्रार अर्जात दिला आहे.
