प्रदिप रघुते नादगांव खंडे.
अमरावती जिल्ह्यातील पं ,समिती नांदगाव खंडेश्वर ,अतंर्गत ग्रामिण भागात 2011 च्या सर्वेक्षण नुसार पात्र लाभार्थ्याना प्रधान आवास योजना ,किवा शबरी,किवां रमाई योजना असो शासणा कडुन मोठ्या प्रमाणात घरकुल चा लाभ दिल्या जाते.सरकारने हा निर्णय आपल्या जागेवर योग प्रकारे अमलात आणला असुन ग्राम पचायत पातडीवर यांची चागंल्या प्रकारे नियमाचे भान ठेवुण गरजुनाच याचा लाभ भेटत आहे.शासणा कडुन एका लाभार्थ्याला1लाख 20 हजार रुपये दिले जाते.आणि रोजगार हमी योजने कडुन 18 हजार रुपये असे एकुण 1लाख 38 हजार दिल्या जाते.पण या मध्ये पचांयत समिती कडुन पहिला चेक हा फक्त 15 हजार रुपये लाभार्थ्याच्या खात्यामध्ये टाकले जाते.
पण हा अधिकांरी लोकांचा मणमानी कारभार होत आहे.पहिले घराचं जोतं बाधुण दाखवा त्यानतंर दुसरा 45 हजाराचा चेक टाकु असे सागितल्या जाते.परंतु एका हिशोबांने जर पहिला खर्च घरकुल लाभार्थाना 50 हजार रुपये येतो.आणि शासन 15 हजार रुपये टाकतो .लाभार्थ्याना घरी अडचण हे अधिकारीच आणत आहे. दुसरी कडे.रेती घेण्यासाठी जर लाभार्थी गेला.तर 8 हजार रुपये टाॅक्टर सागतो.विटा चे भाव तर गगणालाच भिडले मागिल वर्षी विट ही 5000 रु हजार होती.आज तीच विट 7000 हजारावर जावुण ठेपली.सिमेटचे भाव सहामहिण्या अगोदर 290 रुपये होते.आज ते भाव 340 रुपये झाले.मागिल वर्षी लोहाचे भाव मागिल वर्षी 3100 रुपये होता.
आज लोहाचे भाव 5400 वर लोहा गेला.शासणाच्या जिआर प्रमाणे 270 क्रे.फुट चे बाधकाम करण्यासाठी.2 लाख 40 हजार रुपये खर्च येतो.असा खर्च येत असतांना लाभार्थ्याची दाणादान होत आहे.हि लुट कोण करत आहे यांची चौकशी करुण गरीबांना दिलासा देण्यात यावा.कारण आज ह्या सर्व गोष्टीवर प्रशासना तातडीने लक्ष द्यावे ही होणारी लुट थाबंवावी अशी मागणी पात्रं लाभार्थान कडुन होत आहे.कारण 2022 पर्यत केद्र आणि राज्य सरकारने सर्वांना हक्काचे घरकुल देण्याचा संकल्प करुण त्याचा गाजावाजा चालविला असला तरी 15 हजारा एवजी 50 हजार रुपये हे पहिलाच चेक म्हणुन जर लाभार्थ्याच्या खात्यात टाकण्यात यांवा कारण समोरचा खर्च त्यांना भारी जाणार नाही.15 हजार रुपये त्याच्यां खात्यात आल्याने अडचण निर्माण होत आहे.शहरी भागा साठी अडीच लाख रुपये आणि ग्रामिण भागासाठी 1लाख 38 हजार रुपये शहरी आणि ग्रामिण भागात काय फरक ग्रामिणला विटा लागत नाही.ग्रामिण ला सिमेंट लागत नाही का ,उलट शहरी भागा पेक्षा ग्रामिण भागात जास्त खर्च येतो.
रेती तस्कर हे शहरी भागातुन रेती आण्यासाठी काॅर्टीग लागतो असे बोलुण गरीब लाभार्थ्याची हे लोकं पैशा अभावी फसवणुक करत आहे.पंचायत समिती कडुन नोटीस देण्यात येते 7 दिवसाच्या आत घरकूल बाधंने सुरु करावे आणि 90 दिवसाच्या आत घरकुलाचे बाधकाम पुर्ण करावे.जर बाधकाम प्रथम हप्ता शासन खाती परत करण्यात यावा सदर रक्कम परत न केल्यास महसुली नियमानुसार.म्हणजेच त्याच्यां राहत्या घरावर बोजा चढविण्यात येईल,पण,परतु ग्राॅमिण भागातील लाभ्यार्थाना मा.मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अमरावती यांनी लाभार्थाची होणारी लुट थाबवुण 15 हजारामध्ये खरच त्याचं जोतं उभं होईल का याचा विचार करावा.एकी कडे घरकुल तातडीने बांधा म्हणुन सागता दुसरी कडे हार्डवेअर व रेती ,विटा ,कडुन लुट.
