रामचंद्र मुंदाने , अमरावती जिल्हा प्रतिनिधी
कोविड-19 विषाणू प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेचा शुभारंभ . अमरावती जिल्ह्यात 16 जानेवारी 2019 रोजी सकाळी अकरा वाजताच्या दरम्यान. जिल्हा सामान्य रुग्णालय येथे खासदार नवनीत राणा यांच्या हस्ते करण्यात येऊन. जिल्हा रुग्णालयातील जिल्हा कार्यक्रम अधिकारी विजय साखरे व महिला वैद्यकीय अधिकारी उज्वला मोहोड हे या लसीकरणाचे पहिले मानकरी ठरले .
अमरावती जिल्ह्यात अमरावती येथील जिल्हा सामान्य रुग्णालय व डॉक्टर पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालय. अचलपूर उपजिल्हा रुग्णालय . तिवसा ग्रामीण रुग्णालय . तसेच अंजनगाव बारी येथील प्राथमिक आरोग्य केंद्र या पाच केंद्रावर लसीकरणाचा शुभारंभ करण्यात आला असून . प्रत्येकी शंभर लाभार्थी प्रमाणे पाचशे लाभार्थ्यांची शुभारंभाच्या दिवशी लसीकरणासाठी निवड करण्यात आली होती . व याच लाभार्थ्यांना 28 दिवसानंतर दुसरा डोस दिला जाणार आहे . पहिल्या टप्प्यात सोळा हजार 262 हेल्थकेअर वर्कर चे लसीकरण होणार असून. कोवीशिल्ड व कोव्हॅक्सीन दोन लसींचा लसीकरणात समावेश करण्यात आला आहे . जिल्ह्यात सुरुवातीला कोवी शील्ड लसींचा 17000 डोज प्राप्त झाला आहे .
या लसीकरण मोहिमेच्या शुभारंभाच्या वेळी वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टर, परिचारिका , आरोग्य कर्मचारी यांनी लसीकरण मोहिमेचे उत्साहात स्वागत करून. जिल्हा सामान्य रुग्णालयातील नर्सिंग स्कूल मधील लसीकरण केंद्रात अनेक डॉक्टर, परिचारिका आदी वैद्यक क्षेत्रातील फ्रंट लाईन वर्कर्स चे लसीकरण करण्यात आले.या वेळि लसीकरण व निरामय आरोग्याच्या संदेश देणाऱ्या रांगोळ्या केंद्रावर रेखाटण्यात आल्या होत्या. प्रतीक्षा कक्ष , लसीकरण कक्ष व निरीक्षण कक्ष अशी केंद्राची रचना करण्यात आली होती . राज्याच्या महिला व बालविकास मंत्री एडवोकेट यशोमती ठाकूर, खासदार नवनीत राणा , आमदार सुलभाताई खोडके, महापौर चेतन गावंडे, जिल्हाधिकारी शैलेश नवाल आदी अनेक मान्यवरांनी केंद्राला भेट देऊन कोविड योद्धा आरोग्य अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करून त्यांचे मनोबल वाढवले.

