Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

अमरावती येथे पोलिओ लसीकरणाचा आ. सुलभाताई खोडके यांच्या हस्ते शुभारंभ

Responsive Ad Here

रामचंद्र मुंदाने, अमरावती जिल्हा प्रतिनिधी 


  पोलिओ लसीकरणापासून एकही बालक सुटू नये - आ. सुलभाताई खोडके  

    पल्से पोलिओ लसिकरण मोहिमेंतर्गत   अमरावती महानगर पालिकेच्या राष्ट्रीय प्लस पोलिओ लसीकरण मोहिमेचा शुभारंभ 31 जानेवारी  2021 रोजि गाडगे नगर येथिल संत गाडगे बाबा समाधी मंदिर येथे आ . सुलभाताई खोडके यांच्या हस्ते करण्यात आला . यावेळी आमदार सुलभाताई खोडके यांच्या हस्ते शून्य ते पाच वयोगटातील बालकांना दोन थेंब जीवनाचे पाजून त्यांचे पोलिओ लसीकरण करण्यात आले . याप्रसंगी मनपा वैद्यकीय अधिकारी (आरोग्य ) डॉ. विशाल काळे , वैद्यकीय अधिकारी स्वच्छता डॉ सीमा नेताम , नगरसेविका सुरेखा लुंगारे , डॉ.जयश्री नांदुरकर , कृष्ठरोग सहायक शारदा तायडे, आरएचओ परिचारिका प्रतिभा थोरात एएनएम अस्मिता वैद्य ,आरोग्य सहायक किसन मदने , आरोग्य सेविका वर्षा  कोठे , आलोक कोठे आदींसह आरोग्य कर्मचारी उपस्थित होते .  दिनांक 27 मार्च,2014 मध्येक भारत देशास पोलिओ निर्मुलन प्रमाणपत्र मिळाले. तरी सुध्दा  खबरदारी म्ह्णुन पोलिओ मोहीम राबविली जाते आहे . प्रत्येक घरा-घरा पर्यंत पोहोचणारी ही लोकाभिमुख मोहीम आहे. शहरामधील लाभार्थ्यां पासून तात्पुरत्या  वसाहती, स्थलांतरीत वसाहतींमधील लाभार्थी, झोपडपट्टी, बांधकाम, वीटभट्ट्या इत्यापदी ठिकाणी काम करणा-या कामगारांच्याा मुलांनाही सेवा मिळेल असे नियोजन महापालिकेने केले आहे. 

   


   भारत देशातून पोलिओच्या समूळ उच्चाटनासाठी या मोहिमेला अधिक लोकाभिमुख बनविण्याचे आवाहन आ. सुलभाताई खोडके यांनी केले . दरम्यान आ. सुलभाताई खोडके यांनी जिल्हा सामान्य रुग्णालयातील पल्स  पोलिओ लसीकरण केंद्राला भेट दिली . यावेळी आ. सुलभाताई खोडके यांच्या हस्ते बालकांना पोलिओचे डोस पाजण्यात आले . यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ . श्याम सुंदर निकम , निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रदीप  निरवणे, वैद्यकीय अधिकारी डॉ . रेखा गोहाड , जिल्हा कार्यक्रम अधिकारी अजय साखरे , आरएमओ बाह्य- संपर्क डॉ . प्रशांत घोडाम , तसेच परिचारिका व आरोग्य सेविका व कर्मचारी आदी उपस्थित होते . 

    गत वर्ष भरापासून आपण सर्व कोरोना महामारीशी लढत आहोत . आरोग्य विभागातील डॉक्टर , परिचारिका, कर्मचारी हे एखाद्या योध्याप्रमाणे काम करून वैद्यकीय सेवा बजावत आहेत .  असे असतांनाही सार्वजनिक  आरोग्य विभागाने साथरोग , कृष्ठरोग , क्षयरोग निर्मूलनाची मोहीम यशस्वीरीत्या राबवली , व आता पोलिओ लसीकरण मोहिमेची पुरेपूर अंमलबजावणी करून बालकांच्या पोलिओ मुक्तीसाठी दाखविलेली तत्परता व घेतलेली दक्षता ही प्रशंसनीय असल्याचे गौरवोद्गार या प्रसंगी सुलभाताई  खोडके यांनी व्यक्त केले .  पोलिओ लसीकरणापासून  एकही बालक सुटू नये म्हणून गृहभेटी व आवश्यक तिथे प्रत्यक्ष जाऊन लसीकरण करण्यात यावे , अशी सूचना  आ. सुलभाताई खोडके यांनी या प्रसंगी केली .