Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

सोनाली दुधाट यांना आचार्य पदवी प्रदान

Responsive Ad Here

रामचंद्र मुंदाने, अमरावती जिल्हा प्रतिनिधी   


      कोठा(वेणी) येथील रहिवाशी व शिवशक्ती माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालय, यवतमाळ येथे कार्यरत सोनाली सुरेंद्र दुधाट(भोरे) यांना संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने भूगोल विषयांतर्गत आचार्य पदवी प्रदान केली आहे. सोनाली दुधाट यांच्या शोध प्रबंधाचा विषय‘ पश्चिम विदर्भ क्षेत्रातील बेंबळा जलसिंचन प्रकल्पाचा लोकसंख्येच्या आर्थिक सामाजिक विकासावर झालेल्या परिणामांचे भौगोलिक विश्लेषण‘ हा होता.

या शोध प्रबंधासाठी मार्गदर्शक डॉ.एस.बी.आखरे यांनी मोलाचे मार्गदर्शन केले.तसेच विषयाशी संबधीत विविध कार्यालयातील अधिकारी वर्ग यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

मुलाखतीला डॉ.एस.बी.धनुश्वर,मार्गदर्शक डॉ.एस.बी.आखरे, डॉ.मुंदे(सिनेट सदस्य), डॉ.टोम्पे(सिनेट सदस्य) ,एस.आर.बंड(सहायक निंबधक ,पी.एचडी विभाग), एम.एन.दिवेकर(अधिक्षक,पी.एचडी विभाग) इत्यादी उपस्थित होते.सोनाली दुधाट यांचे प्रेरणास्थान शिवशक्ती शिक्षण संस्था,कोठा(वेणी) चे संस्थापक स्व.भाऊसाहेब भोरे हे आहेत.यशाचे श्रेय त्यांनी मार्गदर्शक डॉ.एस.डी.आखरे ,शिवशक्ती शिक्षण संस्था,कोठा(वेणी)चे सचिव सुशिल कुमार भोरे,सुरेखाताई व सुरेंद्र दुधाट,डॉ.स्वप्निल दुधाट ,रियाताई,शशिकांत भोरे व समस्त परिवाराला दिले.या यशाबद्दल शिवशक्ती शिक्षण संस्था,कोठा(वेणी)चे अध्यक्ष दिनेश भोरे,व्यवस्थापक बाळासाहेब धांदे,प्रा.गणेश ठाकरे,मनोहर गेडाम,इफ्तेखानरूद्दीन काझी सर्व संचालक, मुख्याधापक घनश्याम तायडे,प्राध्यापक,शिक्षक वर्ग व शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच डॉ.दिप्ती दुधाट,प्रणाली व डॉ.स्वप्निल काळे,वैभव काळमेघ,गौरव साळवे,सुरज सोटे,चांदूर रेल्वे खरेदी विक्री संघाचे उपाध्यक्ष सचिन जाधव,डॉ.नाना,महेंद्र दुधाट यांनी त्यांचे कौतुक केले.