लोणार शेख सज्जाद शे करामत
विनापरवाना अवैध रेती चोरी करून वाहतूक करणारे ट्रॅक्टर 12 जानेवारी 2019 रोजी तालुक्यातील गुंजखेड येथे पकडले याबाबत सविस्तर असे की गुंजखेड शिवारातून दिवसाढवळ्या रेतीची अवैध वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती लोणार तहसीलदार सैपन नदाफ यांना मिळाली
त्यांनी आपले सहकारी नायब तहसीलदार हेमंत पाटील ,मंडळ अधिकारी विष्णू केंद्रे, तलाठी काशिनाथ इप्पर,मंडळ अधिकारी विलास नागरे, सुभाष गोदमले ,तलाठी सरदार यांना तात्काळ गुंजखेड रस्त्यावर पाठविले गुंजखेड शिवारात दुपारी तीन वाजे दरम्यान रिसोड येथील संदीप आश्रुजी इरतकर हा विना नंबरचे ट्रॅक्टर मधून एक ब्रास रेती ची चोरी करून अवैध वाहतूक करताना आढळून आला नायब तहसीलदार हेमंत पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी ते ट्रॅक्टर जप्त करीत लोणार पोलीस स्टेशनला जमा करण्यात आले आहे या घटनेमुळे अवैध रेती माफियांचे धाबे दणाणले असून अवैध रेती वाहतूक करणाऱ्या वर कडक कारवाई करण्यात येण्याचा इशारा तहसीलदार सैपन नदाफ यांनी दिला आहे
महसुल विभागाकडुन कार्यवाही मात्र पोलीस प्रशासनाकडुन अवैध रेती चोरी करणाऱ्या वाहतुकदारावर मेहरबानी
लोणार तालुक्यात मोठया प्रमाणात अवैधरित्या रेती चोरी करून वाहतुक करीत असल्याचे उघड झाले असे असताना सुध्दा महसुल प्रशासनाकडुन रात्री बे रात्री रेतीचोरी करणाऱ्या वाहनाधारकावर कडक कार्यवाही करीत आहे एकीकडे महसुल प्रशासन कार्यवाही करीत आहे तर दुसरी कडे पोलीस प्रशासन या रेती वाहतुक करणाऱ्याकडुन चिरीमिरी घेउन प्रकरण दाबल्या जात असल्याचे नुकतेच उघड झाले.
लोणार तालुक्यातील पुर्णा नदीपात्रातुन दोन दिवसापुर्वी एक टिप्पर अवैधरित्या रेती चोरी करीत असल्याचे बिबी पोलीसाच्या लक्षात येताच त्यांनी या रेती चोर वाहतुकीचा पाठलाग केला असता सदर टिप्पर हे तांबोळा या गावात आले त्यावेळेस बिबी पोलीसानी सदर रेती वाहतुक करणाऱ्या वाहनाकडुन आर्थीक तडजोड करून सोडुन देण्यात आले असुन तांबोळा हे गाव लोणार पोलीस स्टेशन हददीत येत असुन असे असताना सुध्दा बिबी पोलीसानी या प्रकरणात मोठे हात ओले केले आहे याबाबत वरिष्ठ अधिकारी कार्यवाही करतील काय ? याकडे तालुकयातील जनतेचे लक्ष लागले आहे.
