Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

कोव्हिड-१९ संबंधित कर्तव्य बजावताना मृत्यू होणाऱ्या कर्मचाऱ्यांना विमा कवच लागू करण्याबाबतचा निर्णय जाहीर

Responsive Ad Here

मो.असलम परवेज लोणार तालुका प्रतिनिधी

       कोरोनाच्या संकट काळात कोविड-१९ संबंधित सर्वेक्षण, जनजागृती, मदत कार्य अशा विविध कार्यवाहीदरम्यान कर्तव्यावर असणाऱ्या राज्यातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना वित्त विभागाच्या निर्णयानुसार "५० लाख रुपयांचे सर्वकष वैयक्तिक अपघात विमा कवच' लागू करण्यात आले आहे. त्यामुळे कोरोनाशी संबंधित कर्तव्यावर असताना कोविडमुळे मृत्यू झालेल्या शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या कुटूंबियांना या "विमा कवचा'चा लाभ मिळू शकणार आहे.

                        कोविड -१९ विषाणूच्या अनुषंगाने सर्वेक्षण, शोध, प्रतिबंध, चाचणी, उपचार, मदत कार्य या कार्यवाहीशी संबंधित कर्तव्यावर कार्यरत सर्व कर्मचाऱ्यांना ५० लाख रुपये रक्कमेचे सर्वकष वैयक्तिक अपघात विमा कवच पुरविण्याबाबत वित्त विभागाने २९ मे २०२० व १४/१०/२०२० नुसार शासन निर्णय लागू केला होता.

      या निर्णयाप्रमाणे राज्यातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना देखील विमा कवच मिळावे, अशी मागणी विविध संघटनांमार्फत सातत्याने होत होती. त्यासाठी विविध पातळ्यांवर पाठपुरावा देखील केला जात होता. आता प्राथमिक शिक्षण संचालनालयाने राज्यातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे मे २०२० च्या शासन निर्णयाच्या तरतुदी पूर्ण करणारे परिपूर्ण प्रस्ताव मागितले असून शासन निर्णयानुसार हे प्रस्ताव तपासून संबंधित प्रस्तावावर योग्य ती कार्यवाही करण्यात येणार असल्याची माहिती अधिकृत सुत्रांनी दिली आहे.

               प्राथमिक शिक्षण संचालनालयाने उशिरा का होईना कोरोनाबाबत कर्तव्य बजावणाऱ्या शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना न्याय देणारे हे "विमा कवच' लागू करण्यासंबंधी कार्यवाही सुरू केली आहे, हे निश्‍चितच स्वागतार्ह आहे. यासाठी संघटनेने मंत्रालयात तसेच संचालक कार्यालयाला वारंवार पत्रव्यवहार केले होते.