जामनेर प्रतिनिधी
जामनेर- तालुक्यातील खादगाव जि प शाळेच्या उपक्रमशील शिक्षिका रत्नप्रभा शिवराम गोरे यांना *महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ व जिल्हा महिला शिक्षक संघटना* यांच्या संयुक्त विद्यमाने उपक्रमशील शिक्षिका या गटातून *सावित्रीबाई फुले गुणवंत शिक्षिका* पुरस्कार दिनांक 3 जानेवारी सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्ताने घोषित करण्यात आला.त्यांचा या पुरस्कारामुळे शाळेतील शिक्षक व मुख्याध्यापक यांच्याकडून ,समस्त ग्रामस्थांकडून तसेच सर्व अधिकार वर्गाकडून अभिनंदनाचा वर्षाव करण्यात येत आहे.
सदर पुरस्कार आचारसंहितेनंतर जिल्ह्याचे पालक मंत्री माननिय गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व जलसंपदा मंत्री यांच्या हस्ते आणि बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत वितरीत होणार आहे
