Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

लोणार - मेहकर मतदार संघाचे आमदार संजय रायमुलकर यांच्या गाडीचा अपघात

Responsive Ad Here

मो.असलम परवेज: लोणार तालुका प्रतिनिधी

    लोणार - मेहकर मतदार संघाचे शिवसेना आमदार संजय रायमुलकर यांच्या गाडीचा दि.०९ जानेवारी २०२१ रोजी रात्री ११:४० च्या दरम्यान जालना येथे अपघात झाला. या अपघातात मुलगा निरज संजय रायमुलकर सहित पाच जण किरकोळ जखमी झालेत. एक वर्षापूर्वी सुद्धा याच तारखेला मेहकर जानेफळ रस्त्यावर आमदार संजय रायमुलकर यांच्या गाडीचा अपघात होऊन त्यात आमदार संजय रायमुलकर यांना दुखापत झाली होती.

     प्राप्त माहिती नुसार शिवसेना आमदार संजय रायमुलकर यांचा मुलगा निरज संजय रायमुलकर व त्याचे मित्र ९ जानेवारी ला औरंगाबाद येथून मेहकरला गाडी क्रमांक एमएच २८ बीके २७७७ ने परत येत असताना जालना येथील कन्हेयानगर ते बीड बायपास रस्त्यावर गाडीचा टायर फूटून अपघात घडला व गाडीने रस्त्याच्या खाली पलटी घेतली. 

                     या अपघातात निरज संजय रायमुलकर, वरद ठाकूर, ऋषी पागोरे, प्रतिक इंगळे व सुनील पंडारे किरकोळ जखमी झाले. या वेळेस निरज रायमुलकर हे स्वतः वाहन चालवत होते.