Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

नेताजी सुभाषचंद्र बोस जयंतीनिमित्त रासप तर्फे अभिवादन

Responsive Ad Here




प्रतिनिधी @ किरण वाघ

 देश गौरव नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा जयंतीनिमित्त राष्ट्रीय समाज पक्ष व भैरव फाउंडेशन तर्फे तहसील चौक स्थित नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले.

        मलकापूर शहराला नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या विचारांचा वारसा लाभलेला असून मलकापूर येथे स्वातंत्र्यलढ्याच्या काळात सुभाषचंद्र बोस यांच्या झालेल्या जाहीर सभेमुळे मलकापूरची नोंद देशाच्या क्रांतीकारी इतिहासात पाहायला मिळते. अशा या राष्ट्रभक्त "तुम मुझे खून दो मैं तुम्हे आजादी दूंगा" असा नारा देणाऱ्या आझाद हिंद स्थापना करून देशासाठी ब्रिटिश साम्राज्याला टक्कर देणाऱ्या नेताजींना राष्ट्रीय समाज पक्षातर्फे विनम्र अभिवादन करीत श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
        यावेळी राष्ट्रीय समाज पक्षाचे जिल्हाध्यक्ष धनश्रीताई काटीकर पाटील, जिल्हा संघटक प्रा. प्रकाश ताटे , युवा जिल्हाध्यक्ष करणसिंग सिरसवाल , जिल्हा उपाध्यक्ष सय्यद ताहेर,  शहर अध्यक्ष संतोष वानखेडे, सदस्य शक्ती कदम ,  जय कदम,  अंशू खरात , भैरव  फाऊंडेशनचे राज्य कार्यकारिणी सदस्य विजय वानखेडे, जिल्हाध्यक्ष अनंता दिवनाले , तालुका अध्यक्ष रोशन वाकोडे , शहर अध्यक्ष मनीष शर्मा इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते