श्रीरामपूर प्रतिनिधी माधव नेहे
येथील प्रकाश किरण प्रतिष्ठान तसेच वर्ल्ड पार्लमेंट यांच्या संयुक्त विद्यमाने श्रीरामपूर येथील उपविभागीय कार्यालयात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते प्रसंगी प्रांताधिकारी साहेब श्री अनिल पवार तसेच तहसीलदार श्री प्रशांत पाटील यांचे शुभहस्ते वर्ल्ड पार्लमेंट अध्यक्ष महाराष्ट्र राज्य डॉ दत्ता विघावे तसेच पत्रकार राजेंद्र देसाई यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले
श्रीरामपूर तालुक्यात वर्ल्ड पार्लमेंट यांच्या माध्यमातून सामाजिक धार्मिक शैक्षणिक क्षेत्रात विविध उपक्रम सुरु असून वर्ल्ड पार्लमेंटच्या सर्व पदाधिकारी तसेच सदस्यांचे कार्य कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन प्रांत अधिकारी श्री अनिल पवार यांनी केले यावेळी प्राध्यापक लेविन भोसले यांनी प्रकाश
किरण प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून कार्यक्रमाचे आयोजन केले होते प्रसंगी प्रांताधिकारी श्री अनिल पवार तहसीलदार श्री प्रशांत पाटील डॉक्टर दत्ता विघावे प्राध्यापक लेविन भोसले पत्रकार राजेंद्र देसाई सामाजिक कार्यकर्ते प्रवीण निकम आदी पदाधिकारी उपस्थित होते.

