Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

साईआश्रया पुस्तकालय उद्घाटन सोहळा

Responsive Ad Here

नाशिक येवला प्रतिनिधी:- माधव नेहे

     साईबाबांच्या कृपाशीर्वादाने सुरू असलेल्या सबका मालिक एक प्रतिष्ठान संचलित साई अश्रया परिवार येथे पुस्तकालय उद्घाटन सोहळा पार पडला यावेळी बुलढाणा अर्बन बँकेचे चेअरमन मा. श्री.राधेश्यामजी चंडक साहेब व समता चॅरीटेबल ट्रस्ट चे मा.श्री.ओमप्रकाश काकासाहेब दादाप्पा कोयटे तसेच मा.श्री.संदीप भैय्या कोयटे व मा.श्री.खासदार सदाशिवराव लोखंडे साहेब यांच्या शुभहस्ते पार पडला  यावेळी बँक ऑफ इंडियाचे डायरेक्टर श्री.सतीषजी मराठे व सहकार भारतीचे राष्ट्रीय महामंत्री श्री. उदयजी 

      जोशी हे उपस्थित होते यावेळी मुलांनी या सर्व अतिथी साठी छान स्वागत गीत सादर केले यानंतर थोडक्यात साईआश्रया चे कार्य या सर्व अतिथी समोर मांडले यानंतर सर्व अतिथींनी आपले मनोगत व्यक्त केले येथील साईआश्रया च्या प्रकल्पाची या सर्व अतिथींनी पाहणी केली याठिकाणी बनवलेल्या टाकाऊ पासून टिकाऊ वस्तु व पुस्तकालय येथे बनविलेले बांबूपासून चे फर्निचर बघितल्यानंतर सर्वांना याचे फार कौतुक वाटले .

        साई आश्रया चे कार्य असेच पुढे जावे व निराधार अनाथ मुलांना व वयोवृद्धां चे भविष्य उज्ज्वल व्हावे अशा अनंत शुभेच्छा या सर्वांनी आम्हाला दिल्या  परिवाराकडून सर्व अतिथींना व साईआश्रया परिवारातील सर्व मुलांना आजी-आजोबांना नाश्ता देण्यात आला मुलांनी साईआश्रयातील साई बगीचा येथून पाने व फुले यापासून बनविलेल्या पुष्पगुच्छानी या सर्व अतिथींचे स्वागत सत्कार केले अशाप्रकारे साईआश्रया येथे आनंदाने छान असा पुस्तकालयाचा उद्घाटन सोहळा पार पडला.