Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अमरावती आजीवन अध्ययन व विस्तार विभाग अंतर्गत पदव्युत्तर पदविका योगा थेरपी अभ्यासक्रमाच्या वतीने ऑनलाईन पद्धतीने संत गाडगे बाबांची जयंतीकार्यक्रमाचे आयोजन

Responsive Ad Here

  अमरावती प्रतिनिधी 

        अमरावती  शहरामध्ये वाढता करोणा चा प्रभाव व त्यामुळे करण्यात आलेले लॉक डाऊन यामुळे सर्व सार्वजनिक कार्यक्रम, उत्सव सध्या बंदच आहे केवळ आवश्यक सुविधांची आस्थापने सुरू आहेत. आज मानवतेचे पुजारी, स्वच्छतेचे जनक कर्मयोगी संत गाडगेबाबा यांची जयंती आहे.संत गाडगे महाराजांची जयंती सर्व ठिकाणी केली जाते विशेषतः अमरावती शहरामध्ये गाडगेनगर येथे मोठ्या उत्साहाने साजरी केली जाते.परंतु करोनाचे गांभीर्य लक्षात घेऊन संत गाडगे बाबा अमरावती युनिव्हर्सिटी मध्येही ऑनलाईन पद्धतीने जयंती साजरी करण्यात आली कार्यक्रमाचे आयोजन आणि सूत्रसंचालन विषय समन्वयक प्रा शुभांगी रवाळे मॅडम यांनी केले. 


            कार्यक्रमाची सुरुवात संत गाडगेबाबांच्या गीताने करण्यात आली प्रा शुभांगी रवाळे यांनी गाडगेबाबांच्या दशसूत्री वरून आपण  आपले विचारामध्ये परिवर्तन करणे काळाची गरज आहे असे मत व्यक्त केले.विद्यार्थी अक्षय धानोरकर यांनी कर्मयोगी संत गाडगे बाबांचे विचार तसेच त्यांचे महान कार्य यावर मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमामध्ये प्रा.स्वप्निल मोरे सर प्रा. स्वप्नील इखार सर तसेच सर्व विद्यार्थी ऑनलाईन पद्धतीने उपस्थित होते.प्रा.अश्विनी टाले यांनी आभार प्रदर्शन केले व शांती पाठ करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.