Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

पशु आरोग्य अबाधित ठेवण्याकरीता स्वच्छ पाणी आवश्यक: प्रा. डॉ. अनिल भिकाने, सहयोगी अधिष्ठाता

Responsive Ad Here

अकोला जिल्हा प्रतिनिधी पंकज शिरसाठ

       पाणी हे जिवन असून  दुध उत्पादन  वाढीसाठी अत्यावश्यक असून पाणी कमी मिळाल्यास जनावराच्या  शरीर प्रकृतीवर व प्रजोत्पादन क्षमतेवर विपरीत परिणाम होऊन शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होते, तेव्हा जंतूविरहित स्वच्छ पाणी किमान दिवसातून ३ ते ४ वेळा पशुधनास उपलब्ध करून देणे गरजेचे आहे असे प्रतिपादन स्नातकोत्तर पशुवैद्यक व पशुविज्ञान संस्थेचे सहयोगी अधिष्ठाता प्रा. डॉ. अनिल भिकाने यांनी केले. ते दत्तकग्राम  मोरगाव भाकरे येते  धर्माळा स्वच्छता अभियान अंतर्गत आयोजीत    कार्यक्रमात बोलत होते. संस्थेच्या वतिने धर्माळ्याची स्वच्छता करून चुन्याने आतून रंग रंगोटी  करून प्रात्यक्षीक दाखवण्यात आले व तदनंतर मार्गदर्शनाचा कार्यक्रम घेण्यात आला. 

    या प्रसंगी प्रा डॉ. मिलिंद थोरात  यांचेही मार्गदर्शन झाले.  दुषीत पाण्यामुळे जनावराना त्वचेचे विकार होणे, गर्भपात होणे, हगवण लागणे असे विकार होतात त्यामुळे गावातील धर्माळ्याची  नियमित स्वच्छता राखणे आवश्यक असून महिन्यातून किमान एक वेळेस  धर्माळ्यातील आतील बाजूस चुन्याने रंगरंगोटी करावी जेणेकरून शेवाळ वाढणार नाही असे सांगितले.  या प्रसंगी प्रा.डॉ सुनील वाघमारे, अकोला पंचायत समिती सदस्या सौ. शुभांगी गोपाळराव भटकर,   सौ.उमाताई माळी, अर्चनाताई चोपडे,  ग्रामपंचायत सदस्य पांडुरंग भाकरे , बाबाराव वंजारे व गजानन वाघ  यांची प्रमुख उपस्थिती होती. 

    कार्यक्रमाचे औचीत्य साधून धर्माळ्याची स्वच्छता या वरती संस्थेने तयार केलेली घडिपत्रीकेचे विमोचन करण्यात आले व उपस्थीत नागरीकाना घडिपत्रीका वितरित कस्यात आल्या.कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यक्रम समन्वयक डॉ. एम .आर.वडे , सूत्रसंचालन डॉ. महेश इंगवले यांनी केले तर, आभार डॉ. गिरीश पंचभाई यांनी मानले.कार्यक्रम यशस्वी होण्याकरिता डॉ. प्रशांत कपले, भौरदचे पशुधन पर्यवेक्षक  आर एफ सय्यद व ग्रामस्थ यांनी योगदान दिले. सदरिल कार्यक्रमात गावकर्‍यानी येथून पूढे धर्माळ्याची नियमीत स्वच्छता ठेवण्याची जिम्मेदारी घेतली.