गणेश महाजन एरंडोल तालुका प्रतिनिधी
एरंडोल तालुक्यातील उमरदे येथील ग्रामपंचयती च्या सरपंच पदी सुरेखा बाई सुखदेव पाटील यांची निवड करण्यात आली असुन उपसरपंच पदी बाजीराव रामदास हटकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत उमारदे ग्रामपंचायत मध्ये निवडणूक न होता.संपुर्ण ५ सदस्य हे बिनविरोध निवडून आले आहे.ग्रामपंचायत बिनविरोध झाली व नुकतेच सरपंच पदाचे आरक्षण जाहीर होऊन सदर ग्रामपंचायत च्या सरपंच पदासाठी सर्वसाधारण महिला आरक्षण जाहीर झाले.यावेळी बिनविरोध निवडून आलेल्या सर्व सदस्यांच्या एकमताने सुरेखा बाई सुकदेव पाटील यांची सरपंच पदी तर उपसरपंच पदी बाजीराव रामदास हटकर यांची निवड करण्यात आली. निवडणूक अधिकारी म्हणुन विजय चव्हाण, ग्रामसेवक उल्हास जाधव यांनी काम पाहिले.
यावेळी सदस्य विजय गणसिंग पाटील,मधुकर काळु खैरनार, सुमनबाई काशिनाथ पवार,धुरपताबाई पुंडलिक सोनवणे,सुनंदाबाई सुपडू हटकर उपस्थित होते तसेच यावेळी उपस्थित सदस्यांनी व नूतन सरपंच व उपसरपंच यांनी सर्व ग्रामस्थांचे बिनविरोध करून दिल्याबद्दल आभार मानले.दरम्यान याप्रसंगी उमरदे ग्रामपंचायती मध्ये शिवसेनेची सत्ता असल्याचा दावा नूतन पदाधिकाऱ्यांनी केला आहे.
याप्रसंगी एरंडोल नगर नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष संजय महाजन,शिवसेनेचे युवा शहर प्रमुख अतुल महाजन,पत्रकार आबा महाजन,रवींद्र पाटील,संदीप पाटील,रमेश पाटील,एकनाथ पाटील,भिका पाटील,सुरेश टेलर,गोटू पाटील, गोकुळ पाटील,बोमा हटकर, युवराज सोनवणे,दिगंबर नाईक, काशिनाथ नाईक इत्यादी उपस्थित होते.
