Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

शिवसेवा करिअर अकॅडमी अंतर्गत भव्य आर्मी / पोलीस भरती सराव स्पर्धेचे आयोजन संपन्न

Responsive Ad Here
नाशिक येवला प्रतिनिधी माधव नेहे

      येवला  तालुक्यातील अंगणगाव येथे शिवसेवा करिअर अकॅडमी यांच्या अंतर्गत सात फेब्रुवारी 2021 रोजी सकाळी 9 वाजता आयोजित करण्यात आले होते या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे व मार्गदर्शक म्हणून येवला शहराचे पोलीस ठाण्याचे माननीय श्री पोलीस निरीक्षक संदीप जी कोळी साहेब व शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक माननीय प्रवीण भाऊ बनकर हे या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी म्हणून उपस्थित होते तसेच माननीय श्री संदीप जी कोळी साहेब यांच्या हस्ते सरस्वती पूजन व उद्घाटन करण्यात आले तसेच सर्व युवा भरतीतील विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन करण्यात आले व साहेबांच्या हस्ते सोळाशे मीटर ची ही स्पर्धा सुरू करण्यात आली या स्पर्धेचे नियोजन मुले व मुली या करिता केले असून व या स्पर्धेत नाशिक जिल्ह्यातून विद्यार्थ्यांची संख्या उपस्थित होते या स्पर्धेत साधारणता तीनशे विद्यार्थ्यांचा समावेश होता.



   या स्पर्धेत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी बक्षिसाचा समावेश करण्यात आला होता प्रथम पारितोषिक पाच हजार द्वितीय पारितोषिक 3000 तृतीय पारितोषिक 2000 हजार असेच तीन गटांमध्ये ( मुले व मुली ) ट्राफि सह 30 हजार रुपयांचे पारितोषिकांचा समावेश केला होता व या स्पर्धेचे पंच म्हणून विविध क्रीडा क्षेत्रातील खेळाडू पंच बोलवण्यात आले होते पंच प्रमुख स्वप्नील बाकळे,  नवनाथ उंडे ,सचिन पगारे, गणेश कुऱ्हाडे, मंदार खैरे,  दत्तू जाधव,सुमित गायकवाड, सूर्यकांत गायकवाड, निकम सर , निखिल सुर्यवंशी , नरेंद्र गोडगे , ऋतिक भाभड , अमोल राजगुर या सर्वांनी पंच म्हणून महत्वाची कामगिरी बजावली.मैदानी चाचणी मध्ये 1600मीटर ,  100मीटर ,गोळा फेक , फुल्फस , असे चार प्रकारची स्पर्धा घेण्यात आली व लेखी चाचणी पेपर घेत्यात आला.

    या सर्व स्पर्धेचे आयोजन शिवसेवा करियर ॲकॅडमी अंगणगाव ,येवला यांनी केले होते अकॅडमीचे संचालक मा श्री प्राध्यापक कुणाल जी भावसार व तसेच अकॅडमीचे मैदानी चाचणीचे मेजर मा श्री गोविन्द पंच मेडे प्रा अमोल वाघ सर , प्रा कल्पना चव्हाण मॅडम अंकुश गाढवे सर यांनी आयोजन केले होते.व गोविंद गायकवाड , कोल्हे मामा ,सागर पाबळे व अकॅडमीचे विद्यार्थी व  विद्यार्थिनी पालकांचे या सर्वांचे सहकार्य लाभले होते